मास्क न लावणाऱ्या उपद्रवींकडून आतापर्यंत तब्बल ३५ लाख २१ हजारांचा दंड वसूल; उपद्रव शोध पथकातील जवानांची कारवाई   

till now 35 lacs fine collected from people not wearing mask
till now 35 lacs fine collected from people not wearing mask

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकातील जवानांनी मंगळवारी मास्क न घालणाऱ्या २२० जणांवर दंडात्मक कारवाई केली. आतापर्यंत १० हजार ३२५ नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरात कोव्हीडचे थैमान सुरू असूनही नागरिकांची आरोग्याबाबत बेजबाबदारी दिसून येत आहे. अशा बेजबाबदार नागरिकांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी उपद्रव शोध पथकाने २२० नागरिकांकडून प्रति व्यक्ती पाचशे रुपयेप्रमाणे १ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. 

मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाईत लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ४८, धरमपेठ अंतर्गत ३७, हनुमाननगरअंतर्गत १७, धंतोलीअंतर्गत १४, नेहरुनगर अंतर्गत ८, गांधीबागअंतर्गत १९, सतरंजीपूराअंतर्गत १४, लकडगंजअंतर्गत १४, आशीनगर अंतर्गत २१, मंगळवारी झोन अंतर्गत २७ आणि मनपा मुख्यालयात १ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांनी सांगितले. दंडाची रक्कम १५ सप्टेंबरपासून ५०० रुपये करण्यात आली आहे. 

५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ४८५५ बेजबाबदार नागरिकांकडून २४ लाख २७ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे. त्यापूर्वी दोनशे रुपये प्रती व्यक्तीप्रमाणे १० लाख ९४ हजारांचा दंड करण्यात आला होता.

झोननिहाय कारवाई

लक्ष्मीनगर -- १४१६
धरमपेठ -- १८८२
हनुमाननगर -- ९६४
धंतोली -- ९१४
नेहरूनगर -- ५८२
गांधीबाग -- ६७३
सतरंजीपुरा -- ६९८
लकडगंज -- ६१५
आशीनगर -- १११९
मंगळवारी -- १२९८
मनपा कार्यालय -- ८४ 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com