
नागपुरात असे काही अजब गुन्हे घडले आहेत ज्यांची चर्चा फक्त शहरातच नाही तर संपूर्ण देशात झाली. गेल्या दशकात घडलेल्या अशाच काही थरारक गुन्ह्यांबद्दल आम्ही सांगणार आहोत.
नागपूर : भारतात गुन्हे, हत्या, मारामारी, भांडण तंटे या गोष्टी काही नवीन नाहीत. महाराष्ट्रही गुहेगारीत मागे नाही. गुन्हेगारीत भारतात क्रमांक दोनला आहे ते नागपूर शहर. नागपुरात प्रत्येक दिवसाला शेकडो गुन्ह्यांची नोंद होते. गुन्ह्यांच्या काही घटना इतक्या भयंकर असतात की बातमी ऐकून किंवा त्याबद्दल कल्पना करून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. नागपुरात असे काही अजब गुन्हे घडले आहेत ज्यांची चर्चा फक्त शहरातच नाही तर संपूर्ण देशात झाली. गेल्या दशकात घडलेल्या अशाच काही थरारक गुन्ह्यांबद्दल आम्ही सांगणार आहोत.
ही थरारक घटना गेल्या दशकातील नसली तरी नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. नागपुरातील हत्येची सगळ्यात तहरीर घटना म्हणजे महिलेवर अत्याचार करणाऱ्या अक्कू यादवची जमावाकडून हत्या. भरत कालिचरण उर्फ अक्कू यादव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती होत. त्यानं तब्बल १० वर्ष अनेक महिलांवर अत्याचार केला होता. ज्यामुळे त्याच्यावर अनेक खटले नागपूर जिल्हा न्यायालयात सुरु होते. १३ ऑगस्टची सकाळ अक्कू यादव हा तारखेला कोर्टात हजार होता. सुनावणी सुरु असताना अचानकतब्बल २०० ते ३०० महिलांचा जमाव कोर्टात आला. महिलांनी अक्कू यादव याला जबर मारहाण सुरु केली. या मारहाणीत अक्कु यादव कोसळला. महिलांनी त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकलं तसंच त्याच्यवर दगडफेक करण्यात आली. महिलांपैकी एकीनं त्याच्या अंतरंगाला कापलं. न्यायाधीशांच्या खुर्चीसमोर अक्कू यादव रक्ताच्या थारोळ्यात पडला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात तब्बल सहा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अक्कू यादव १० वर्षांपासून महिलांवर बळजबरीनं अत्याचार करत होता आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता. तसंच पोलिसांत तक्रार नोंदवूनही पोलिस दुर्लक्ष करत होते त्यामुळे महिलांनी टोकाचं पॉल उचललं असं ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांचं म्हणणं होतं. पुढे या प्रकरणात महिलांच्या विरोधात साक्षीदार मिळाला नाही आणि पुरावा नसल्यामुळे महिलांची सुटका करण्यात आली. हा थरार घेऊन फक्त नागपूरात नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
हेही वाचा - भंडाऱ्यात एका पत्रकाने उडविली खळबळ, पोलिस दलही लागले कामाला
११ ऑक्टोबर २०११, अवघ्या ८ वर्षांचा कुश कटारिया हा चिमुकला घरासमोर खेळताना अचानक बेपत्ता झाला. शोधाशोध सुरु झाली आणि काही वेळातच कुशचं अपहरण झाल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. अपहरणकर्त्यांनी तब्बल करोड रुपयांची मागणी कटारिया कुटुंबासमोर केली मात्र उशीर झाल्यानं कुशची अमानुष पद्धतीनं हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कटराइड कुटुंबाचा शेजारी असलेल्या आयुष पुगलिया याला अटक केली. त्यासोबतच त्याच्या ३ साथीदारांनाही अटक करण्यात आली. घटनास्थळी सापडलेल्या रक्तानं भरलेल्या कपड्यांमुळे पोलिसांना पुरावा प्राप्त झाला. या घटनेची चर्चा फकीर नागपुरातच नाही तर मुंबईपर्यँत झाली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः कुटुंबाची भेट घेतसांत्वन केलं. तसंच आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर या प्रकरणाची जबाबदारी उज्वल निकम यांच्याकडे देण्यात आली.
कुश कटारिया याच्या हत्येप्रमाणेच सप्टेंबर २०१४ रोजी डॉक्टर महेश चांडक यांचा मुलगा युग चांडक याचं वर्धमान नगरातील राहत्या घरातून पहारा करण्यात आलं. अपहरण कर्त्यांनी युगाच्या पालकांना तब्बल १० करोड रुपयांची मागणी केली. हा करार त्यानंतर ५ करोडवर आला. खंडणीची रक्कम मुंबईला पोहोचवा असं आरोपींकडून सांगण्यात आलं. मायर उशीर झाल्यामुळे राजेश डावर आणि अरविंद सिंग या दोन आरोपींनी चिमुकल्या युगाच्या डोक्यावर आणि अंगावर दगडांनी वार केले. यानंतर युगचा मृतदेह नागपूरपासून तब्बल ३० किमी दूर असलेल्या पाटणसावंगी इथे पुरण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर दहशतीत होतं तसंच राज्यातही एकच खळबळ उडाली होती.
हत्या करणाऱ्याकडून कधी चूक झाल्याबद्दल ऐकलं आहे का? नागपुरात २०११ साली झालेल्या एका हत्याकांडात चक्क चुकीच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. ११ मार्च २०११ रोजी मोनिका किरणापुरे नावाची साधी आणि सभ्य मुलगी कॉलेजपासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर फोनवर बोलत उभी होती. तेवढ्यात दोन गुंड तिच्याजवळ आले आणि तिला थांवण्याचा प्रयत्न केला. तसंच तिला तोंडावरचा रुमाल काढण्यासही सांगितलं. तिनं विरोध केल्यामुळे त्यांनी तिच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले तसंच तीच्या पाठीत चाकूनं अनेक वार केले. मोनिका रक्ताच्या थारोळ्यात पडली. मात्र तिचा चेहरा बघितल्यानंतर आरोपींच्या पायाखालची जमीनच सरकली. कुणाल जैस्वाल नावाच्या एका व्यक्तीनं दुसऱ्याच मुलीला संपवण्यासाठी दोन गुंडांना पाठवलं होतं. मात्र ओळख चुकल्यामुळे मोनिका आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण होतं. राज्यभर अनेक निदर्शनं करण्यात आली होती. आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.
नागपूरच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लीक करा...
फेब्रुवारी २०१३, नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष हेमंत दियेवार यांची शंकरनगर चौकात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागे २ कुख्यात टोळ्यांमधील गॅंगवॉर हे कारण असल्याचं सांगण्यात येतं. चंद्रपूरच्या घुग्गुसमधील कोळसा वाहतुकीवरून हे हत्याकरण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. या हत्येच्या थरारामुळे नागपुरात बरेच दिवस दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ