esakal | कोरोनामुक्तांचा आकडा लाखापर्यंत; जिल्ह्यात सात लाखाजवळ पोहोचल्या कोरोना चाचण्या
sakal

बोलून बातमी शोधा

Total over 1 lakh people are corona free in nagpur

शहरी व ग्रामीण भागात दिवसभरात ७ जणांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला असून ११४ नवीन बाधितांची भर पडली आहे. यामुळे कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ३ हजार ५२५ वर पोहचली आहे.

कोरोनामुक्तांचा आकडा लाखापर्यंत; जिल्ह्यात सात लाखाजवळ पोहोचल्या कोरोना चाचण्या

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : ११ मार्च ते १७ नोव्हेंबर या कालावधीत नागपूर जिल्ह्यात १ लाख ६ हजार ५६१ जणांना कोरोनाची बाधा झाली. सोमवारपर्यंत ९९ हजार ९८८ जणांनी या जीवघेण्या कोरोनावर मात केली आहे.

शहरी व ग्रामीण भागात दिवसभरात ७ जणांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला असून ११४ नवीन बाधितांची भर पडली आहे. यामुळे कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ३ हजार ५२५ वर पोहचली आहे. या मृतकांमध्ये जिल्ह्याबाहेरच्या ४५३ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोनाची लागण झाली आहे.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

 दिल्लीत कोरोनाची नव्याने लाट आली आहे. यामुळे दिल्ली तसेच इतर भागातून नागपुरात दाखल होणाऱ्यांना जिल्ह्याच्या सीमेवर किंवा विमानतळातून काही दिवस विलगीकरणात ठेवण्यात यावे, अशी चर्चा मेडिकल वर्तुळात सुरू झाली आहे.

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोरोना चाचणी करण्याची गती मंदावली आहे. रविवार १६ नोव्हेंबरला १६८० तर सोमवारी १७ नोव्हेंबरला १५०५ चाचण्या जिल्ह्यात झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ९५ हजार ५२४ कोरोना चाचण्यांची नोंद झाली आहे. यात ३ लाख ८४ हजार ४२३ आरटी पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. 

तर ३ लाख ११ हजार १०१ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांची नोंद झाली आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या १५५ जणांमध्ये ९५ जण शहरातील आहेत. तर ६० जण ग्रामीण भागातील आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत शहरी भागातील ७९ हजार ८३ जणांनी कोरोनावर मात केली हे. तर ग्रामीण भागातील कोरोनामुक्तांची संख्या २० हजार ९०५ आहे. कोरोना बाधितांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनामुक्तांचे प्रमाण ९३.८३ टक्के आहे.सोमवारी दिवसभरात शहरात १ तर ग्रामीण भागात ३ जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर जिल्हाबाहेरील ३ जणांचा कोरोनामुळे प्राण गेला आहे. २४ तासांत शहरातील ९० आणि ग्रामीण भागातील २३ जण कोरोनाच्या विळख्यात अडकले.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

केवळ ८४६ कोरोनाबाधित रुग्णालयात

मेयो, मेडिकलसह एम्स आणि नागपूर जिल्ह्यातील ११५ रुग्णालयात आता केवळ ८४६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर सोमवारी शहर आणि ग्रामीण भागात गृहविलगीकरणात २ हजार २०२ रुग्ण उपचार घेत आहेत. असे एकूण ३ हजार ४८ सक्रिय कोरोना बाधित रुग्ण नागपुरात आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ