राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नागपुरातून १८ पीआय बदलले

अनिल कांबळे
Thursday, 29 October 2020

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे प्रमुख संतोष खांडेकर यांची बदली वर्धा येथे झाली असून, पोलिस आयुक्तालायतील पुंडलिक भटकर यांची नागपूर ग्रामीणमध्ये बदली झाली आहे.

नागपूर :  एकाच शहरात विहित कालावधी पूर्ण झालेल्या राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी आज गुरूवारी गृहमंत्रालयाने जाहीर केली. यामध्ये नागपुरातील १८ पोलिस निरीक्षक, १६ सहायक निरीक्षक आणि १७ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे प्रमुख संतोष खांडेकर यांची बदली वर्धा येथे झाली असून पोलिस आयुक्तालयातील पुंडलिक भटकर यांची नागपूर ग्रामिणमध्ये बदली झाली आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम यांची नागपूर ग्रामिणमध्ये बदली झाली असून विशेष शाखेचे सुरेश मडावी यांची मुंबई शहरात बदली झाली आहे.

सविस्तर वाचा - आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का
 

 तसेच एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आणि विजय जाधव यांची नागपूर ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. रोशन यादव (चंद्रपूर), शैलेश संखे आणि शुभदा संखे, विक्रम गौड, महेश ढवाण (पुणे), रविंद्र माळवे (नानविज), राजेंद्र सावंत (मुंबई), विजय करे (अहमदनगर), भानूदास पिदूरकर (वर्धा), अजीत सिद (सांगली) येथे बदली झाली आहे.

वाहतूक शाखेत डीसीपी साळी यांचे रिडर दादाराम करांडे आणि गुन्हे शाखेचे किरण चौघुले यांची कोंकण परिक्षेत्रात तर गुन्हे शाखेचे पंकड धाडगे, गजानन राऊत, सचिन शिर्के यांची पिंपरी चिंचवड येथे बदली झाली आहे. 

एपीआय सुदर्शन गायकवाड आणि अनुपमा जगताप यांची पुण्यात बदली झाली आहे. मानसिंग डुबल (मुंबई), विश्‍वास भास्कर (मसुप्र), अनंत भंडे आणि अरविंद घोडके (नांदेड), विनायक पाटील (कोल्हापूर), संजय परदेशी (सोलापूर), नरेंद्र निसवाडे आणि युनुस मुलानी (लोहमार्ग, नागपूर) यांची बदली झाली आहे.

.संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of police officers in the Maharashtra state