१०३ प्रवाशांचा अहवालशिवाय प्रवास; दिल्ली विमानाने आलेले बारा प्रवासी पॉझिटिव्ह 

Twelve passengers came positive by Delhi plane
Twelve passengers came positive by Delhi plane

नागपूर : दिल्लीहून विमानाने नागपुरात आलेल्या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यातील १२ जण कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले. दिल्ली विमानाने आलेल्या एकूण प्रवाशांपैकी १०३ प्रवाशांकडे चाचणीचा अहवाल नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे त्यांची विमानतळावरच चाचणी करण्यात आली.

देशात पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी पहिल्या दिवशी नागपूर शहरामध्ये दाखल झालेल्या दिल्ली विमानातील १२ प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनात आले आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात या पॉझिटिव्ह रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोव्हिड मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याबाबत मनपा प्रशासनाद्वारे सूचना देण्यात येत आहे.

पुन्हा एकदा कोव्हिडचा वाढता संसर्ग लक्षात घेता विमान प्रवास धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत गरजेच्या वेळीच प्रवास करावा, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन यांनी केले आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा येथे वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. विमानात बसण्यापूर्वी सर्व प्रवाशांनी त्यांची कोव्हिड चाचणी करणे अनिवार्य आहे.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल, बुधवारी विविध शहरातून आलेल्या काही प्रवाशांकडे चाचणी रिपोर्ट नसल्याचे दिसून आले. या प्रवाशांची विमानतळ प्रशासनाद्वारे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

शहरात आलेल्या अहमदाबाद येथील २४, दिल्ली येथील ७९, अशा एकूण १०३ प्रवाशांकडे चाचणी अहवाल नव्हता. या सर्व प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केली असता यामधील १२ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या पथकाने या सर्व प्रवाशांना कोव्हिड दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देऊन त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचीही प्रक्रिया केली जात आहे.

दिल्ली, अहमदाबाद, गोवा, जयपूर या ठिकाणातून नागपूरला येणाऱ्या प्रवाशांना कोव्हिड चाचणी केल्याशिवाय विमानात प्रवेश देण्यात येऊ नये. प्रवाशाकडील चाचणीचा रिपोर्ट पाहूनच त्यांना विमानात प्रवेश द्यावा, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विमानतळ प्रशासनाला दिले आहेत.

रेल्वे स्टेशनवर १,२०० जणांची थर्मल स्क्रिनिंग

रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग केली जाते. प्रवाशांना ताप, खोकल्यासह अन्य संबंधित लक्षणे आढळल्यास त्यांची अँटीजेन चाचणी केली जाते. बुधवारी मनपाने रेल्वे स्टेशनवर १२०० जणांची थर्मल स्क्रिनिंग केली. यातील चौघांना लक्षणे दिसल्यानंतर त्यांची अँटीजेन चाचणी केली करण्यात आली. परंतु चौघांचीही चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे सर्वांना सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, अशी माहिती अप्पर आयुक्त राम जोशी यांनी दिली. मात्र चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला मनपाच्या पाचपावली कोव्हिड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येते. याशिवाय रुग्णाला लक्षण जास्त असल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com