
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिष दादलानी आणि विवेक गुमनानी या दोघांची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली. दोघेही बेरोजगार असून त्यांना दारूचे व्यसन आहे. तसेच त्यांना गर्लफ्रेंड असून त्यांच्यावर खर्च करण्यासाठी दोघेही चोरी, लुटमार करीत होते.
नागपूर : गर्लफ्रेंडवर पैसे उडविण्यासाठी सदर परिसरातून दोन युवक दर दिवशी एक दुचाकी चोरी करीत होते. त्यामुळे नागरिकांसह पोलिस त्रस्त होते. एकापाठोपाठ एक दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. शेवटी सायबर क्राईम पोलिसांच्या मदतीने दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १० दुचाकी जप्त करण्यात आल्या. मोनिष यशपाल दादलानी (२७, कुकरेजानगर, जरीपटका) आणि विवेक सेवक गुमनानी (२२, हसनशहा चौक, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिष दादलानी आणि विवेक गुमनानी या दोघांची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली. दोघेही बेरोजगार असून त्यांना दारूचे व्यसन आहे. तसेच त्यांना गर्लफ्रेंड असून त्यांच्यावर खर्च करण्यासाठी दोघेही चोरी, लुटमार करीत होते. गर्लफ्रेंडवर पैसे उडविण्यासाठी सदर परिसरातून दुचाकी चोरने सुरू केले.
अधिक वाचा - हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती
सपना मुकेश मौर्य (२७, न्यू कॉलनी) यांनी २५ ऑगस्टला घरासमोर मोपेड उभी करून ठेवली होती. रात्रीच्या सुमारात मोनिष आणि विवेक यांनी दुचाकी चोरली. चोरीची दुचाकी ओळखिच्या युवकाकडे गहाण ठेवून १० हजार रूपये घेतले. दोघांनीही गर्लफ्रेंडला बोलावून त्यांच्यासोबत पार्टी केली. सर्व पैसे त्यांनी प्रेयसींवर उडवले.
पैसे संपल्यानंतर पुन्हा दुचाका चोरीचा प्लान आखला. दरम्यान सदरचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी आतापर्यंत चोरी गेलेल्या दुचाकींचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. फुटेजमध्ये मोनिष आणि विवेक हे आढळून आले. त्या दोघांचा शोध घेण्यात आला. जरीपटक्यात ते पुन्हा दुचाकी चोरीचा प्लान करीत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.
चोरीची दुचाकी छावणी परिसरात असलेल्या ट्रान्स फिटनेस सेंटरच्या पार्कींगमध्ये उभी करून ठेवत होते. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या दुचाकीची नंबर प्लेट चोरीच्या दुचाकीला लावत होते. ती दुचाकी टोईंग करून डुप्लीकेट किल्ली बनविणाऱ्याकडे नेत होते. कुणी हटकल्यास स्वतःच्या दुचाकीची कागदपत्रे दाखवत होते.
अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?
सदर पोलिसांनी ओरोपींकडून १० दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरीची दुचाकी गहाण ठेवणे किंवा स्वस्तात विकून टाकत होते. पैसे आल्यानंतर ते दारू पार्टी आणि गर्लफ्रेंडदर उडवित होते. त्यांना दोनदा पोलिसांनी संशयित म्हणून पकडले होते. मात्र दुसऱ्याच दुचाकीची आरसी दाखवून सुटले होते.
संपादन - अथर्व महांकाळ