
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वजारोहण केले जाते. दर वर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक नगर परिषद व तहसील कार्यालयातर्फे शहरातील गणमान्य नागरिकांना आमंत्रित करण्यासाठी पत्रिका छापण्यात आल्या आहेत.
कामठी (जि. नागपूर ) : २६ जानेवारी हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. मात्र, येथील नगर परिषद व तहसील कार्यालयाकडून छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर वर्षात बदल असल्याने नेमका प्रजासत्ताक दिन ७१ वा की ७२ वा आहे, यात संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा
सविस्तर असे की २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वजारोहण केले जाते. दर वर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक नगर परिषद व तहसील कार्यालयातर्फे शहरातील गणमान्य नागरिकांना आमंत्रित करण्यासाठी पत्रिका छापण्यात आल्या आहेत. नगर पालिकेने निमंत्रण पत्रिकेत ७२ वा प्रजासत्ताक दिन, तर तहसील कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिकेत ७१ वा प्रजासत्ताक दिन, असे छापण्यात आले आहे. या दोन्ही पत्रिका बघितल्यानंतर कार्यक्रम एकच तर वर्ष वेगवेगळे कसे असू शकणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - महिलेच्या घरात घुसून डोक्यावर ठेवली बंदूक अन् केली विचित्र मागणी; घटनेनं परिसरात खळबळ
याबाबत तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान तयार करून देशाच्या स्वाधीन केले होते. मात्र, त्याची अंमलबाजावणी २६ जानेवारी १९५० पासून करण्यात आली असल्याने हा २६ जानेवारी २०२१ हा ७१ वा प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -
दुसरीकडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता पत्रिकेत काय केले बघतो? असे सांगितले. यावरून असे दिसून येते की शासकीय अधिकारी किंवा कार्यालयाला याबाबत नेमकी माहिती नाही. देशात संविधान लागू करण्यात आल्याचे वर्ष जर नेमके कोणते माहिती नसेल तर या कर्मचाऱ्यांना काय म्हणावे लागेल, हे मात्र सांगणे कठीणच आहे.