मोठ्या शस्त्रसाठ्यासह दोन गुंडांना अटक; तुरुंगात जाण्यापूर्वी सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते शस्त्र

अनिल कांबळे
Saturday, 17 October 2020

जुगार माफिया विजय मोहड हत्याकांडातील आरोपी लल्ला सध्या कारागृहात बंद आहे. कारागृहात जाण्याच्या सुमारे सहा महिन्यांपूर्वी लल्लाने हा शस्‍त्रसाठा सांभाळून ठेवण्यासाठी कार्तिककडे दिला होता. दोन्ही गुंडांविरूद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने अजनी हद्दीतून दोन कुख्यात गुंडांना जेरबंद केले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर घातक शस्‍त्रांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. प्रतीक सुनील फुलझेले (२१, रा. ओंकारनगर चौक, गजानननगर) व कार्तिक शर्मा (२५, रा. हावरापेठ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी गुन्हेगारांच्या शोधात फिरत असताना दोन्ही गुंडांनी मोठा शस्‍त्रसाठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. यातील आरोपी कार्तिक शर्मा याच्याविरुद्ध शहरातील विविध ठाण्यांमध्ये खून, दरोडा, गंभीर दुखापत, जुगार असे एकूण सात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कार्तिक हा कुख्यात गुन्हेगार रजत ऊर्फ लल्ला शर्मा याचा भाऊ आहे.

अधिक माहितीसाठी - पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला

जुगार माफिया विजय मोहड हत्याकांडातील आरोपी लल्ला सध्या कारागृहात बंद आहे. कारागृहात जाण्याच्या सुमारे सहा महिन्यांपूर्वी लल्लाने हा शस्‍त्रसाठा सांभाळून ठेवण्यासाठी कार्तिककडे दिला होता. दोन्ही गुंडांविरूद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून तलवार व चाकूसह १० प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनीट चारचे पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, एपीआय किरण चौगुले, दिलीप चंदन, एएसआय रमेश उमाठे, सचिन तुमसरे, आशीष क्षीरसागर या पथकाने केली.

संपादन - नीलेश डाखोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Hooligans arrested with large arms