कार भरधाव निघाली आणि अनियंत्रित झाली, झाले असे अघटित...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

कारचालक छत्तीसगडवरून भोपाळला जात होता. दरम्यान चालकाचे वाहनावरून नियंत्रन सुटले आणि दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथे रवाना करण्यात आले. तर कारमधील दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अरोली पोलिसांनी पती-पत्नी दोघांना ताब्यात घेतले असून, कारचालक दिनेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोदामेंढी (जि. नागपूर) : शुक्रवारी एक कार छत्तीसगडवरून भोपाळला जात होती. तर दोघे दुचाकीवरून नागपुरातील पंचाळा येथून तांडा गावाकडे येत होते. दरम्यान, रामटेक-भंडारा मार्गावरील मसला फाट्याजवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार दोघेही जागीच ठार झाले. विलास अरविंद भंडारकर (वय 32) व अनिल हेमराज तांडेकर (वय 40, दोघेही रा. तांडा, ता. मौदा) अशी मृतांची नावे आहेत. एकाच गावातील दोघांच्या मृत्यूमुळे तांडा गावात शोककळा पसरली आहे.

Image may contain: 1 person, closeup
मृत विलास भांडारकर

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल व विलास दोघेही दुचाकीने पंचाळा येथून तांडा गावाकडे येत होते. रामटेक-भंडारा मार्गावरील मसला फाट्यानजीक पोहोचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने दुचाकीला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दोघांचाही मृत्यू घटनास्थळीच झाला होता, तर कार मार्गाच्या कडेला लोटलेली होती.

काय झालं असेल? - घर हाकेच्या अंतरावर असताना चिमुकला स्कूलबसमधून उतरला अन्‌...

कारचालक छत्तीसगडवरून भोपाळला जात होता. घटनेची माहिती अरोली पोलिसांना मिळताच ठाणेदार विवेक सोनवणे घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथे रवाना करण्यात आले. कारमध्ये दिनेश कुमार (वय 55) व संध्या सिंग (वय 50, दोघेही रा. हबीबगंज, भोपाळ) बसून होते. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अरोली पोलिसांनी पती-पत्नी दोघांना ताब्यात घेतले असून, कारचालक दिनेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अरोली पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in car accident at Nagpur