ड्युटी बजावण्यासाठी होता रस्त्याच्या कडेला उभा अन्‌ घडले अघटित...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

तीन वाहन रविवारी सकाळी जबलपूरवरून मनसरच्या दिशेने येत होते. बोलोरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने कारला धडक दिली नंतर ट्रकला धडक दिली. यात दोघांना जीव गमवावा लागला. हा विचित्र अपघातात बोलेरो कारच्या अतिवेगामुळे झाला. पोलिसांनी जखमींना उपजारासाठी रुग्णालयात पाठवले असून, पोलिसांची कारवाई सुरू होती. 

रामटेक (जि. नागपूर) : रामटेक-जबलपूर महार्गावर रविवारी (ता. 12) सकाळ विचित्र अपघात झाला. एका कारने दुसऱ्या कारला धडक दिली मग ती कार ट्रकला जाऊन धडकली. दुसरी कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पोलिस शिपायाला धडकली. यात पोलिस शिपाई रितेश भोपरे जागीच ठार झाला असून, अन्य एक महिलाही ठार झाली आहे. अपघातानंतर जखमींना रुग्णालयात पाठविले असून, पोलिसांची कारवाई सुरू होती.

हेही वाचा - अपमान जिव्हारी लागल्याने भाजप कार्यकर्त्याने केले असे...

नागपूर जिल्ह्यातील रामटेक-जबलपूर महामार्गावरील मरारवाडी गावाजवळ एक बोलेरो कार वेगाने येत होती. त्याच दिशेने अन्य गाड्याही जात होत्या. सर्वकाही सुरळीत असताना बोलेरो चालकाने गाडीचा वेग वाढवला. काही वेळातच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुसऱ्या एका कारला जोरदार धडक दिली. बोलेरो कार अतिवेगात असल्याने समोरील ट्रकला जाऊन धडकली. या धडकते बोलेरो कारमधील महिला ठार झाली.

Image may contain: 1 person, closeup
मृत रितेश भोपरे

 

बोलेरो कारने ज्या दुसऱ्या कारला धडक दिली, ती कार रस्तादुभाजकावरून उलटून दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. दुसऱ्या बाजूला उभा असलेला पोलिस शिपाई रितेश भोपरे याला कार धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. हे तिन्ही वाहन जबलपूरवरून मनसरच्या दिशेने येत होते.

Image may contain: outdoor

बोलोरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला असून, दोघांना जीव गमवावा लागला. या विचित्र अपघातात अजून काही जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना उपजारासाठी रुग्णालयात पाठवले असून, पोलिसांची कारवाई सुरू होती. 

हेही वाचा - दाद मागायची कोणाला? पोलिसच असुरक्षित, वाचा काय झाले...

अल्पोहार नेऊन देणे भोवले

रस्त्याच्या कडेला रितेश भोपरे हा वाहतूक पोलिस नेहमीप्रमाणे आपली ड्युटी बजावत होता. भूक लागल्याने त्याने हॉटेलमध्ये अल्पोहारचा ऑर्डर दिला. यानंतर तो रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला. पोलिसाला अल्पोहार आणून देण्यासाठी हॉटेलमधील कर्मचारी रस्त्याच्या दिशेने निघाला. यावेळी विविच अपघात झाल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. तो अल्पोहार देण्यासाठी आला नसता तर जखमी होण्यापासून वाचला असता.

Image may contain: 3 people, people standing, car, tree, sky and outdoor

शुक्रवारीही गेला दोघांचा जीव

कार शुक्रवारी छत्तीसगडवरून भोपाळला जात होती. तर दोघे दुचाकीवरून नागपुरातील पंचाळा येथून तांडा गावाकडे येत होते. दरम्यान, रामटेक-भंडारा मार्गावरील मसला फाट्याजवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार दोघेही जागीच ठार झाले. एकाच गावातील दोघांच्या मृत्यूमुळे तांडा गावात शोककळा पसरली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in a strange accident in Nagpur district