तुम्ही प्रेमीयुगुल आहात अन्‌ प्रायव्हसी हवी आहे?, मोबईल आहे ना...

अनिल कांबळे
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

नागपूर : मोबाईलवर उपलब्ध असलेल्या हॉटेल बुकिंगच्या वेगवेगळ्या ऍप्सचा वापर प्रेमीयुगुलांमध्ये वाढला आहे. मोबाईलवरूनच तास-दोन तासासाठी रूम बूक करण्याला मोठी पसंती दिली जात आहे. मोबाईल ऍप्समुळे मोठमोठ्या हॉटेलमध्ये चक्‍क देहव्यापार सुरू असून, कायदेशीर अडचणींमुळे पोलिसांनाही कारवाई करण्यास जड जात आहे. 

नागपूर : मोबाईलवर उपलब्ध असलेल्या हॉटेल बुकिंगच्या वेगवेगळ्या ऍप्सचा वापर प्रेमीयुगुलांमध्ये वाढला आहे. मोबाईलवरूनच तास-दोन तासासाठी रूम बूक करण्याला मोठी पसंती दिली जात आहे. मोबाईल ऍप्समुळे मोठमोठ्या हॉटेलमध्ये चक्‍क देहव्यापार सुरू असून, कायदेशीर अडचणींमुळे पोलिसांनाही कारवाई करण्यास जड जात आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक लॉज आणि हॉटेल्समध्ये चोरून-लपून देहव्यापार सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गृहमंत्रालयाने सर्वच लॉजवर सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश लॉज मालकांना दिले होते. त्यामुळे प्रेमीयुगुलांना "प्रायव्हसी'ची मोठी अडचण निर्माण झाली होती. उपराजधानीत "मॉर्डन देहव्यापर' म्हणून ब्युटी पार्लर, मसाज पार्लर, आयुर्वेदिक चिकित्सालय आणि महिला फिटनेस सेंटर अशा ठिकाणांचा वापर होतो. मात्र, प्रायव्हसी मिळण्याचे सर्वाधिक सुरक्षित स्थान म्हणून युवा पीढी मोबाईल ऍप्सवरून नामांकित हॉटेल बुकिंगकडे वळले आहेत.

असे का घडले? - नऊ वर्षांचा चिमुकला कानात सोन्याची बारी घालून शाळेत गेला अन्‌...

हॉटेलमध्ये मुक्‍कामी राहणाऱ्यापेक्षा तास-दोन तास खोली भाड्याने घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल मालकाची रात्री "स्टे' करणाऱ्यांपेक्षा जास्त कमाई दिवसभऱ्याच्या बुकिंगवरून होत आहे. कॉलेजवयीन मुले प्रेयसीसोबत पालकांच्या डोळ्यात धूळ फेकून ऍप्सवरून रूम बूक करून हॉटेल गाठतात. त्यासाठी पाण्यासारखा पैसा हॉटेलमालक आणि सर्विस बॉयवर उडवितात.

Image result for lover in hotel clipart

साधारण रूमचे तासभराचे भाडे 1,200 ते 2,000 रुपये आहे. सर्व सुविधायुक्‍त मीडियम क्‍लास रूमचे भाडे 2,200 ते 2,800 रुपये आहे. सोबतच हाय क्‍लास आणि एसी रूमही 2,800 ते चार हजार रुपयांत अलिशान कारमधून आलेल्या प्रेमीयुगुलांना उपलब्ध करून देण्यात येते. हॉटेलवर नोंदणी रजिस्टरमध्ये प्रेमीयुगुल आपापले आधारकार्ड दाखवतात आणि थेट रूम गाठतात. ऍप्सवरून रूम बूक केल्यास भविष्यात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही, याची शाश्‍वती असते. 

Image result for lover in hotel

कोणतीही चौकशी नाही

कॉलेजवयीन युवक व युवतींची गर्दी पूर्वी लॉजवर होत होती. मात्र, आता मोबाईलवरी ऍपवरून सहज बुकिंग उपलब्ध होत असल्यामुळे लॉजकडे कुणी फिरकत नाही. रूम बूक केल्यानंतर त्यामध्ये जाणारे कोण? सोबतच्या मुलीचे वय काय? रूम बूक करण्याचा हेतू काय? या सर्व गोष्टी हॉटेलमालक कधीच बघत नाही. त्यामुळे एकांतात क्षण घालविण्यासाठी मोबाईलवरून हॉटेल बुकिंगचे प्रमाण वाढले आहे. 

Image result for lover in hotel

पर्याय ठरत आहेत बगिचे!

लॉजवर पोलिसांच्या धाडीची भीती असल्यामुळे अनेक "कपल्स' ऍप्सवरून रूम बुकिंगडे वळत आहेत. तसेच काही प्रेमीयुगुल अंबाझरी गार्डन, बॉटनिकल गार्डन, फुटाळा तलाव, सक्‍करदरा तलाव आणि तेलंगखेडी बगिचा आदी ठिकाणचा शोध घेतात. येथील सुरक्षा रक्षकांना शे-दोनशे दिल्यास "योग्य' जागा प्रेमीयुगुलांना शोधून दिली जाते. तसेच कुणी अडथळा निर्माण करू नये म्हणून काळजी पण घेतली जाते.

जाणून घ्या - ठेक्‍याने घेतलेल्या शेताच्या पैशांचा झाला डोंगर... मग उचचले हे पाऊल

असा आहे रेटबोर्ड

  • रूमभाडे - 1000 ते 4200 एक रूम (प्रति तास) 
  • चहा - 50 ते 80 रुपये कप 
  • कॉफी - 100 ते 150 रुपये कप 
  • नास्ता - 200 ते 350 रुपये प्लेट 
  • जेवन - 550 ते 850 रुपये थाली 
  • पाणी बॉटल - 50 रुपये 
  • स्नॅक्‍स - 100 रुपये 
  • सर्विस बॉय चार्ज - 200 पेक्षा आपल्या मर्जीनुसार 

Image result for नीलेश भरणे

अनैतिक बाबीकडे पोलिसांचे लक्ष 
अनेक हॉटेलमध्ये मोबाईलवरील ऍप्सद्वारे रूम बूक केली जात असल्याची माहिती आहे. जर हॉटेलमध्ये अनैतिक देहव्यापार किंवा प्रेमीयुगुल अनैतिक कामासाठी जर रूम बूक करीत असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा हॉटेल्सवर छापे घालून हॉटेलमधील अनैतिक धंदे बंद करण्यात येतील. या बाबीकडे पोलिसांचे लक्ष आहे. 
- नीलेश भरणे, 
अप्पर पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The use of hotel app increased in young lovers