विश्वास बसेल का? मतदार यादीत ९९ वर्षांवरील तब्बल तीन हजार १५४ मतदार; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

नीलेश डोये
Saturday, 21 November 2020

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, नियमित मतदारांच्या नोंदणीचा कार्यक्रम १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. पाच जानेवारीपर्यंत नवीन मतदार नोंदणी करू शकतील. यानंतर १५ जानेवारीला मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या पडताळणीत तब्बल तीन हजार १५४ मतदारांचे वय ९९ वर्षांपेक्षा अधिक आहे. यामुळे अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी यात काही त्रुटी असून, याद्यांची दुरुस्ती केली जात असल्याचे सांगितले.

मतदार यादीतील नाव, पत्ता, फोटोचा घोळ काही नवीन नाही. वयाच्या घोळाचा नवीन प्रकार समोर आला आहे. लाखोंच्या घरात मतदार असल्याने छोट्यामोठ्या चुकांकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, नियमित मतदारांच्या नोंदणीचा कार्यक्रम १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. पाच जानेवारीपर्यंत नवीन मतदार नोंदणी करू शकतील. यानंतर १५ जानेवारीला मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

इतकेच नव्हे तर मतदार यादीत दोन वेळा नाव असलेले तब्बल २६ हजार ६८३ मतदार असल्याचेही सांगितले. तसेच २ लाख ४ हजारांवर मतदारांचे फोटोच कार्डवर नाहीत. तेव्हा नवीन मतदारांनी आपापली नावे नोंदवतानाच मतदारांच्या नावामध्ये पत्त्यात व वयामध्ये काही दुरुस्त्या असतील तर ते करून घ्यावे. तसेच कुटुंबात मृत झालेल्या मतदाराचे नाव कमी करण्यासाठी संबंधित कुटुंबाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Verification of voter lists started in Nagpur district