उपराष्ट्रपती म्हणाले, 'टेन्शन' निर्माण कराल तर 'अटेन्शन' मिळणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

युवकांनी मनातील नकारात्मक भूमिका काढून घेत सकारात्मकतेने काम करावे. देशात धर्म व जातीला कुठलेच स्थान नाही. शांतता ही प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. शांतता देश आणि जगासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

नागपूर : देशात बस, ट्रेन आणि वाहने जाळण्यापेक्षा स्वत:मधील इनोव्हेटीव्ह आयडीयांना प्रज्ज्वलीत करा. हिंसेतून समस्यांचे निराकरण होणार नाही. देशात टेन्शन निर्माण केल्यास त्याकडे सरकार कुठलेही अटेन्शन देणार नसल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले. 

Image may contain: 2 people, people smiling

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशभरात सीएए आणि एनआरसीवरून आंदोलने सुरू आहे. आंदोलनाला देशभरात हिंसक वळण आलेले आहे. त्यामुळे देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हिंसेतून देशात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असे होत असतानाच जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे या तणावात भर टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे देशाचे वातावरण ढवळून निघाले आहे. सर्व परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना उपराष्ट्रपती नायडू बोलत होते.

हेही वाचा - मी बॅंक अधिकारी आहे, तुमच्या मुलीसोबत लग्न करीन...

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले, युवकांनी मनातील नकारात्मक भूमिका काढून घेत सकारात्मकतेने काम करावे. देशात धर्म व जातीला कुठलेच स्थान नाही. शांतता ही प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. शांतता देश आणि जगासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तेव्हाच मानवता जगेल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. भारतीय संस्कृतीमध्येही याचाच उल्लेख आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गातूनच सर्व समस्यांचे समाधान शोधने ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. 

Image may contain: 4 people, people standing, wedding and suit

'इन्स्टंट फुड इज कॉन्सटंट डिसिज'

देशातील साहित्याचा सन्मान करावा. केवळ भाषेवरच नव्हे तर आपल्या संस्कृतीवरही विदेशी संस्कृतीचे अतिक्रमण होताना दिसून येते. खाद्यपदार्थांमध्ये "इन्स्टंट फुड' हा प्रकार प्रचलित होत चालला आहे. मात्र, हे आपल्या शरीरालाही परवडणारे नाही. त्यामुळे "इन्स्टंट फुड इज कॉन्स्टेंट डिसिज' असे म्हटले तरी वावगे ठरणार नसल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले. 

Image may contain: 8 people, people smiling, people standing

'हेल्दी फुड'कडे वळा

आपल्या संस्कृतीत ऋतूनुसार जेवनाच्या पद्धती आणि व्यंजनाचे प्रकार आत्मसात करण्यात आले आहे. ते आपल्या जीवनातही उपयोगी पडणारे आहे. त्यामुळे इन्स्टंट फुड पेक्षा "हेल्दी फुड'कडे वळा असे आवाहन व्यंकया नायडू यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Vice-President said, that if you create 'tension' then there will be no attention