ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिवांवर गुन्हे दाखल करा; कुणी केली ही तक्रार

VRAS Demands File FIR Against Energy Minister and Energy Secretary
VRAS Demands File FIR Against Energy Minister and Energy Secretary

नागपूर :  वीजबिलाच्या धसक्यातून ऊर्जा मंत्र्यांच्या मतदार संघातील वीजग्राहक लिलाधर गायधने यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणारे ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिवांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी मृताची पत्नी रेखा गायधने व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज यशोधरानगर ठाण्यात तक्रार देत केली.

पावणे ले-आउट येथीर रहिवासी लिलाधर गायधने यांना ४० हजारांचे विजबिल पाठविण्यात आले. त्यांनी बिलाचा धसका घेतला. त्यानंतर अधिकारी विज कापायची धमकी देत होते. वारंवार विनंती करूनही कर्मचारी ऐकत नव्हते. याच नैराश्यातून त्यांनी ८ ऑगस्टला रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्त्या केली, असा रेखा यांचा आरोप आहे. त्यांच्या सोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यशोधरानगर पोलिस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार दिली.

लिलाधर यांच्या आत्महत्तेला ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव, महावितरणचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंत्यां विरोधात आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याती मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. 

समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगीतले, महागडी विज देऊन ग्राहकांची लुटमार केली जात आहे. कोरोनाच्या संकटकाळी संपूर्ण विज बिल महाराष्ट्र सरकारने भरावे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीसह सर्व जनता आंदोलन करीत आहे. परंतु, सरकार निर्णयच घेत नाही. त्यामुळे गायधने सारखे अजून बरेच विजग्राहक आत्महत्त्या करतील त्याची जबाबदारी सरकारवर राहील. सरकारने त्वरीत विज बिल मुक्तीचा निर्णय घेतला असता तर गायधने यांनी आत्महत्या केली नसती म्हणून या आत्महत्तेला सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

शिष्टमंडळात मुकेश मासुरकर, विष्णु आष्टीकर, नितीन अवस्थी, सुनिता येळणे, प्रशांत जयकुमार, प्रशांत मुळे, प्रिती दिडमुठे, रवींद्र भामोडे, गणेश शर्मा, अन्नाजी राजेधर, शोभा येवले, अमित गायधने, सुरेश निनावे, संजय राऊत, दिलीप दडमल आदींचा समावेश होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com