नागपुरातील शैक्षणिक संस्थाचे रॅंकिंग जाणून घ्यायचे आहे...वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

दरवर्षी देशभरातील विद्यापीठ, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, वैद्यकीय, फार्मसी आणि विधी शाखेतील महाविद्यालयांचे रॅंकींग करण्यात येते. विद्यापीठ आणि महाविद्यालयांची गुणवत्ता तपासून हे रॅंकींग ठरविण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून पहिल्या दोनशे महाविद्यालय, विद्यालयांचा समावेश त्यात केला जातो. यंदाच्या रॅंकींगमध्ये व्हीएनआयटीने बीट्‌स पीलानी, आयआयटी मंडी, थापर इन्स्टिट्यूट, जामिया मिलीया इस्लामिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ऍन्ड टेक्‍नॉलॉजी या संस्थांना मागे टाकले आहे. याउलट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विभागाच्या औषधनिर्माणशास्त्र विभागाने गेल्यावर्षी देशभरात 29 वे स्थान पटकाविले होते. मात्र, यावर्षी ते स्थान चार संस्थांच्या मागे गेले असल्याचे चित्र आहे. 

नागपूर  : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून गुरूवारी घोषित करण्यात आलेल्या "नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकींग फ्रेमवर्क'तर्फे अभियांत्रिकी संस्थांमध्ये विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेने (व्हीएनआयटी) पाच नामवंत संस्थाना मागे टाकून 54.76 गुणासह 27 व्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्यावर्षी रॅंकींगमध्ये व्हीएनआयटी 31 व्या स्थानावर होते. याउलट प्रथमच सहभागी झालेल्या आयआयएम नागपूरला 40 वे स्थान मिळालेले आहे. याशिवाय फार्मसी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विभागाच्या औषधनिर्माणशास्त्र विभागाने चार स्थान मागे जात देशभरात 48.67 गुणासह 33 वे स्थान पटकाविले.

दरवर्षी देशभरातील विद्यापीठ, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, वैद्यकीय, फार्मसी आणि विधी शाखेतील महाविद्यालयांचे रॅंकींग करण्यात येते. विद्यापीठ आणि महाविद्यालयांची गुणवत्ता तपासून हे रॅंकींग ठरविण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून पहिल्या दोनशे महाविद्यालय, विद्यालयांचा समावेश त्यात केला जातो. यंदाच्या रॅंकींगमध्ये व्हीएनआयटीने बीट्‌स पीलानी, आयआयटी मंडी, थापर इन्स्टिट्यूट, जामिया मिलीया इस्लामिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ऍन्ड टेक्‍नॉलॉजी या संस्थांना मागे टाकले आहे. याउलट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विभागाच्या औषधनिर्माणशास्त्र विभागाने गेल्यावर्षी देशभरात 29 वे स्थान पटकाविले होते. मात्र, यावर्षी ते स्थान चार संस्थांच्या मागे गेले असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा : अकरावीचे ऑनलाईन प्रवेश नकोच, का होतेय ही मागणी...

फार्मसी महाविद्यालयामध्ये कामठीच्या किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीने 42.62 गुणासह 48 व्या स्थानावर झेप घेतली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात रामदेवबाबा 113, जी.एच. रायसोनी आणि यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाने संयुक्तरित्या 139 वे स्थान पटकाविले आहे. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने 144 वे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय संस्थांमध्ये दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाने 92 स्थानावरुन थेट 29 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच दंत अभ्यासक्रमात विद्यापीठ 14 व्या क्रमांकावर आहे.

आयआयएम नागपूर 40 व्या क्रमांकावर
व्यवस्थापन शाखेत यावर्षी प्रथमच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी नागपूर (आयआयएमएन) सहभागी झाले. या संस्थेने देशभरातील नामवंत संस्थांमध्ये 47.40 गुणासह चाळीसावे स्थान पटकाविले आहे. यापाठोपाठ नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्‍नॉलॉजीला 44.71 गुणासह 60 वे स्थान मिळाले आहे. गेल्यावर्षी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्‍नॉलॉजीने 70 वे स्थान पटकाविले होते. फॉरेन्सिक सायन्सला 101 ते 150 श्रेणीत स्थान मिळाले आहे.

नागपूर विद्यापीठाचे रॅंकींग घसरले
देशभरातील विद्यापीठांमध्ये यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे रॅंकींग फारच घसरल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी 143 व्या क्रमांकावर असलेले विद्यापीठ यंदा 196 व्या क्रमांकावर आले आहे. विद्यापीठाला 150 ते 200 च्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 53 क्रमांकांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, आर्किटेक्‍चर आणि विधी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात नागपूर विद्यापीठातील एकही महाविद्यालय नाही हे विशेष.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Want to know the ranking of educational institutions in Nagpur ... read on