तुम्हाला विश्‍वासू प्राणी हवा का? आम्ही देतो ना...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

श्‍वानांची पिल्ले दत्तक घेणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती अर्जांमध्ये भरून घेतली जाणार आहे. यासाठी संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड, संपर्क क्रमांकही घेतला जाणार नाही. घराला भेट देऊन श्‍वानांला ठेवायला योग्य सुविधा आहे किंवा नाही याची शहानिशा करूनच पिल्लू दत्तक देण्यात येईल. दत्तक विधान कार्यक्रमानंतरही पुढील सहा महिन्यांसाठी संस्थेचे स्वयंसेवक संबंधित कुटुंबाला भेट देऊन घेतलेल्या पिल्लाची निट काळजी घेतली जात आहे किंवा नाही याची खात्री करणार आहेत. 

नागपूर : शहरात थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांकडून थंडीपासून बचावासाठी विविध उपाय केले जात आहेत. रस्त्यावरील जनावरे मात्र थंडीमुळे बेजार झाली आहेत. शहरातील सेव्ह स्पिचलेस संस्थेतर्फे वर्षभरात बचाव केलेल्या जखमी श्‍वानांच्या 50 गोंडस पिल्लांचा दत्तक विधान कार्यक्रम एक जानेवारीला राबविण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी नववर्षाचे स्वागत करताना या बेघर पिल्लांना आपल्या घरी घेऊन जा आणि हक्काचा निवारा मिळवून द्या असे आवाहन यामार्फत "सेव्ह स्पिचलेस' संस्थेने केले आहे.

सविस्तर वाचा - घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् कोसळले दुःखाचे डोंगर

सेव्ह स्पिचलेस संस्था, दाभा रोड, सांदीपणी शाळेजवळ, नागपूर येथे एक जानेवारी 2020 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत श्‍वानाची पिल्ले दत्तक विधान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी शेकडो प्राणीप्रेमी मेहनत घेत असून, संस्थेने वर्षभरात वाचवलेल्या श्‍वानांना यावेळी दत्तक देणार आहेत. कार्यक्रमात सुमारे 50 श्‍वानांची गोंडस पिल्ले विनामूल्य दत्तक दिली जाणार आहेत. याशिवाय श्‍वानांच्या जाती, त्यांची काळजी कशी घ्यावी, त्यांचे लसीकरण कसे करावे याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन पशुवैद्यकांकडून केले जाणार आहे.

Image may contain: dog

श्‍वानांची पिल्ले दत्तक घेणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती अर्जांमध्ये भरून घेतली जाणार आहे. यासाठी संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड, संपर्क क्रमांकही घेतला जाणार नाही. घराला भेट देऊन श्‍वानांला ठेवायला योग्य सुविधा आहे किंवा नाही याची शहानिशा करूनच पिल्लू दत्तक देण्यात येईल. दत्तक विधान कार्यक्रमानंतरही पुढील सहा महिन्यांसाठी संस्थेचे स्वयंसेवक संबंधित कुटुंबाला भेट देऊन घेतलेल्या पिल्लाची निट काळजी घेतली जात आहे किंवा नाही याची खात्री करणार आहेत.

Image may contain: dog

'मेल पपी'ला अधिक मागणी

सेव्ह स्पिचलेस संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून, आजवर हजारो रस्त्यावरील भटक्‍या श्‍वानांना हक्कांचा निवारा मिळवून देण्यात आला आहे. परंतु, उपक्रमात केवळ मेल पपीला अधिक मागणी असते तर फिमेल पपीला घरी नेण्यात टाळाटाळ केली जात असल्याची खंत संस्थेच्या संचालिका स्मिता मिरे यांनी व्यक्त केली. आम्ही या सर्व फिमेल पपीच्या पुढील सर्व अडचनींची जबाबदारी घेतो. परंतु, तुम्ही त्यांना घरी न्या असे आवाहन मिरे यांनी उपक्रमाअंतर्गत केले आहे.

Image may contain: one or more people and dog

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will happen parents of little puppies