मतदानाची प्रक्रिया सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेंची माहिती

Web casting at all polling stations
Web casting at all polling stations

नागपूर : पदवीधर मतदार संघ निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात १९ उमेदवार आहे. एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत व शांतपणे तसेच पारदर्शकरित्या पार पडावी यासाठी नागपूर जिल्ह्यातील शंभर टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

सर्वच राजकीय पक्षांतील बड्या नेत्यांकडून आपल्या उमेदवारांसाठी पदवीधरांचे मेळावे घेऊन प्रचार सुरू आहे. सोशल मीडियावरही प्रचाराची धामधूम सुरू आहे. नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये दोन लाख सहा हजारांवर पदवीधर मतदार आहेत.

त्यापैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात जवळपास निम्मे म्हणजेच एक लाख २,८०९ इतके मतदार आहेत. यामध्ये ५६,५२७ पुरुष तर ४६,२४७ महिला व ३५ इतर मतदारांचा समावेश आहे.

जिल्ह्यात या मतदारांसाठी १६२ मतदान केंद्रांवर मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व केंद्रांवर दिव्यांगासाठी रॅम्प व व्हिलचेअरसह मतदारांना पिण्याच्या पाण्यासह, मंडप, हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझर आदी अशा १५ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची गैरकारभार होत कामा नये म्हणून मतदानावरून वेबकास्टिंग होणार असून व्हीडीओग्राफीही करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या चमुद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. वेबकास्टिंगचे मॉनिटरिंग हे जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात राहणार आहे.

  • मतदार 
  • एकूण - २,००६,००० 
  • (नागपूर जिल्हा) 
  • एकूण - १,००२,८०९ 
  • पुरुष - ५६,५२७ 
  • महिला - ४६,२४७ 
  • इतर - ३५ 
  • मतदान केंद्र - १६२ (नागपूर जिल्हा)

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com