webcasting will be done on electtion day of graduate constituency in Nagpur
webcasting will be done on electtion day of graduate constituency in Nagpur

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: सर्व मतदान केंद्रावरून होणार वेबकास्टींग; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती 

नागपूर : पदवीधर मतदार संघ निवडणुकीची धामधुम सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात १९ उमेदवार असून, येत्या १ डिसेंबर रोजी मतदानहोणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत व शांतपणे तसेच पारदर्शकरित्या पार पडावी, यासाठी नागपूर जिल्ह्यातील शंभर टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टींगची सुविधा उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

सर्वच राजकीय पक्षांतील बड्या नेत्यांकडून आपल्या उमेदवारांसाठी पदवीधरांचे मेळावे घेऊन प्रचार सुरू आहे. तर सोशल मीडियावरही प्रचाराची धामधुम सुरू आहे. नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये २ लाख ६ हजारावर पदवीधर मतदार असून त्यापैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात जवळपास निम्मे म्हणजेच १ लाख २,८०९ इतके मतदार आहेत. 

यामध्ये ५६५२७ पुरुष तर ४६२४७ महिला व ३५ इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात या मतदारांसाठी १६२ मतदान केंद्रावर मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व केंद्रावर दिव्यांगाकरीता रॅम्प व व्हिलचेअरसह मतदारांना पिण्याच्या पाण्यासह, मंडप, हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझर आदी अशा १५ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची गैरकारभार होत कामा नये म्हणून मतदानावरून वेबकास्टींग होणार असून व्हिडिओग्राफीही करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या चमुद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. वेबकास्टींगचे मॉनिटरिंग हे जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात राहणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com