शुभमंगल सावधान!..जाणून घ्या लग्नसोहळ्यांचे मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

कोरोनामुळे यंदा अनेकांनी नियोजित विवाह सोहळा रद्द करून पुढे ढकलला. त्यापैकी 30 टक्के विवाह या महिन्यात पार पडत आहे.

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांत नागपूर जिल्ह्यात शेकडो विवाह रद्द झाले. आता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत काहींनी याच महिन्यात लग्नाचा बार उडवण्याचे निश्‍चित केले आहे.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

बस्ता खरेदीच्या लगबगीने कापड व सुवर्ण बाजारात नवचैतन्य निर्माण झाले. या महिन्यात विवाहाचे तीन मुहूर्त शिल्लक आहेत. त्यात किमान 30 टक्के विवाह लागणार असल्याचा अंदाज आहे. 

कोरोनामुळे यंदा अनेकांनी नियोजित विवाह सोहळा रद्द करून पुढे ढकलला. त्यापैकी 30 टक्के विवाह या महिन्यात पार पडत आहे. 30 जूनपर्यंत विवाहाच्या तीन तिथी असून, प्रत्येक तिथीला 10 ते 12 विवाह होणार आहेत.

त्यासाठी कुटुंबीय सज्ज झाले आहे. कोरोनाची भीती न बाळगता परवानगी घेऊन तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत हे विवाह होणार आहेत. लॉकडाउन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शहरातील बाजारपेठेला या विवाह सोहळ्यांमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. 

ग्राहकांचे आदराने स्वागत 
अडीच महिन्यांपासून ठप्प कापड बाजार काही प्रमाणात का असेना लग्न बस्त्यांच्या खरेदीसाठी येणाऱ्यांची गर्दी होत आहे. प्रत्येक व्यावसायिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ग्राहकांचे स्वागत करत आहे. लॉकडाउन काळात झालेले आर्थिक नुकसान काही प्रमाणात निघून बाजारपेठ कोरोनाच्या या संकटातून बाहेर येईल, असा व्यावसायिकांना विश्वास आहे. 

लग्नतिथी व मुहूर्त 
25 जून 12. 29मि. 
29 जून 12. 26 मि. 
30 जून 12. 30मि. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

जुलै, ऑगस्टमधील मुहूर्त 
जुलै महिन्यात मुख्य लग्नतिथी नसल्या तरी गौण काळ आहे. या तिथींनादेखील लग्न, साखरपुडा करता येईल. या तिथी जुलै महिन्यात 2, 7, 8, 11, 12, 13, 14, 23, 26, 29, 31 तर ऑगस्ट महिन्यात 2, 4, 8, 13, 30, 31 या तारखा आहेत. 

कापड दुकानदारांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल की नाही अशी शंका होती. पण, ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विवाहाच्या खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. आठवडाभरापासून बस्ता फाडण्यासाठी ग्राहक वाढत आहे. 
- रमेश चौधरी, व्यावसायिक, नागपूर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wedding dates in coming days