"व्हॉट अबाउट सावरकर'ने उघडला हिंदी राज्य नाट्यचा पडदा

"What about Savarkar?" Hindi state drama screen
"What about Savarkar?" Hindi state drama screen

नागपूर : समाजात घडणाऱ्या वैचारिक स्थित्यंतरावर भाष्य करणाऱ्या "व्हॉट अबाउट सावरकर' या नाट्यकृतीने 59 व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेले हे सादरीकरण उडाण एक झेप व हेमेंदू रंगभूमीने प्रस्तृत केले.

प्रवीण खापरे यांचे संहितालेखन व दिग्दर्शन असलेल्या या नाट्यप्रयोगाचे नृत्यदिग्दर्शन सूचना भावसार-बंगाले यांचे होते. भारतात अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून उन्नतीचा मार्ग दाखवला. मात्र, भारतीयांनी महापुरुषांना जाती-धर्म व विचारांच्या बंधनात अडकवले आहे. ही बंधने स्वार्थी मनाच्या लोकांना इतकी मोलाची वाटतात की, देश तोडण्याचे षड्‌यंत्रदेखील काही लोक महापुरुषांच्या विचारांच्या सावलीत करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशात उद्‌भवणाऱ्या प्रत्येक स्थितीचे सखोल विश्‍लेषण केले. तरुणांना त्यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय मोलाचे आहे. अशाच गुंतागुंतीच्या स्थितीत अडकलेल्या विनय या मुलाची कथा या नाट्यप्रयोगाचा गाभा होती. ध्यानस्थ बसून निरामय चैतन्याची मूर्ती साकारू इच्छिणाऱ्या विनयच्या भोवती फिरणारा हा नाट्यप्रयोग होता. भारतात होऊन गेलेल्या समाजसुधारकांच्या व प्रबोधनकारांच्या विचारांचा प्रचार करणारा हा प्रयोग होता. विशेष म्हणजे, वैचारिक नाट्यकृतीत अशा प्रकारची शैली शक्‍यतोवर दिसत नाही. शिवतत्त्वाची आराधना करताना तरुणाला पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे, स्वातंत्र्यवीर सावरकर देतात, असा या नाट्यकृतीचा गाभा होता.

नाट्यप्रयोगात वि. दा. सावरकरांची भूमिका जयंत बन्लावार यांनी अतिशय दर्जेदारपणे साकारली. विचारची भूमिका किशोर येळणे यांनी, विनयची भूमिका गजानन जैस यांनी, विरागची भूमिका यशवंत निकम, विद्रोहीची भूमिका अभिषेक डोंगरे यांनी, शिव गायत्री फेंडर यांनी तर शक्ती ऋतुजा वड्याळकर (जैन) यांनी साकारली. प्रकाशयोजना ज्योती जोगी व जितेंद्र गोस्वामी यांचे होते. नेपथ्य प्रशांत इंगळे च सतीश काळबांडे यांचे होते. रंगमंच व्यवस्थेला वेदान्त रेखडे, नमेश वाडबुधे, श्रेयस मंथनवार, निशाद डबीर, खुशाल रहांगडाले व प्रांशू गोखले यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com