ऐका नागरिकांनो, खुद्द जिल्हाधिकारी जिल्हयातील वाढत्या कोरोनाच्या संदर्भात काय म्हणतात....

सतिश डहाट | Monday, 3 August 2020

एकमेव तालुक्यात गेल्या एक दीड महिन्याच्या कालावधीत कामठी शहरात एकूण ६५९ रुग्ण वाढले.त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला. प्रशासन आणि नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. या संदर्भात रविवारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी कामठी तालुक्याचा दौरा केला व नागरिकांशी संवाद साधून जनतेच्या मनात असलेले गैरसमज दूर केले.

कामठी (जि.नागपूर) : कामठी तालुक्यात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हयातील कामठी या एकमेव तालुक्यात गेल्या एक दीड महिन्याच्या कालावधीत कामठी शहरात एकूण ६५९ रुग्ण वाढले.त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला. प्रशासन आणि नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. या संदर्भात रविवारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी कामठी तालुक्याचा दौरा केला व नागरिकांशी संवाद साधून जनतेच्या मनात असलेले गैरसमज दूर केले. याप्रसंगी ते म्हणाले की, नागरिकांनो कोरोनाची चाचणी वेळीच करून घ्या, प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेचे काटेकोर नियम पाळा व कोरोनाच्या उपचारसंदर्भात वेळीच निदान व उपचार केल्यास कोरोना हमखास बरा होतो, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.

रविवारी कामठी शहरातील ‘हॉटस्पॉट’ ठरलेले वारीसपुरा, इमलिबाग, न्यागोदाम, कामगार नगर भागातील जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खुद्द जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या परिसरात व्यक्तीशः पोहोचून कोरोनाविषयी जनजागृती करीत नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना चाचणी करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

अधिक वाचा  :  ती सारखी तणावात राहायची; अखेर घडले हे...

कामठी तालुक्यात कोरोनाचे थैमान
सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नागपूर जिल्ह्यात चांगलाच पसरला असून जिल्ह्यातील एकूण १३ तालुक्यापैकी एकट्या कामठी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही सर्वाधिक असून जिल्ह्यातील एकूण १३ तालुक्यात झालेल्या १९ कोरोनाबाधित मृत्यूंपैकी १६ रुग्ण हे कामठी शहरातील मृत्युमुखी पडले आहेत. तेव्हा या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता वेळीच पुढाकार घेऊन उपचार घेणे गरजेचे आहे. जेणे करून कोरोनावर मात करून मृत्यूपासून बचाव करता येईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

अधिक वाचा  :  विश्वास बसेल का? आधीच्या काळात पुरुषही घालायचे जोडवे, कारण वाचून बसेल धक्का...

घरीच विलगीकरण करण्यात येईल
कोरोना विषाणू हा जीवघेणा नसून तो एक व्हायरस आहे. तेव्हा या व्हायरससारख्या रोगाला घाबरता कामा नये. या कोरोनासारख्या रोगाची प्रमुख लक्षणे असलेले सर्दी, खासी, ताप, गळा खवखवणे यासारखे लक्षणे असल्यास स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व स्वतःच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कोरोना तपासणी करून घेता उपचार घेतल्यास अवघ्या काही दिवसात कोरोनाच्या औषधोपचारातून कोरोना बरा होतो, तसेच कोरोना विषाणूचे कुठलेही लक्षण नसल्यास एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला औषधोपचारासाठी नागपूरला घरापासून दूर न पाठवता घरीच विलीगिकरन करून औषधोपचार करता येऊ शकतो. तेव्हा नागरिकांनो कोरोनाची चाचणी वेळीच करून घ्या, प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेचे काटेकोर नियम पाळा व कोरोनाचा उपचार संदर्भात कोरोनाचे वेळीच निदान व उपचार केल्यास कोरोना हमखास बरा होतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले. याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तहसीलदार अरविंद हिंगे, नगर परिषद मुख्याधिकारी जुम्मे प्यारेवाले, महिला पोलिस उपनिरीक्षक कटारे, नगरसेवक काशिनाथ प्रधान, नगरसेवक लालसिंग यादव, माजी नगरसेवक मो.अर्शद, आरोग्य निरीक्षक विजय मेथीया, पोलीस कर्मचारी समाधान पांढरे आदी उपस्थित होते.

संपादन  : विजयकुमार राऊत