लॉकडाउनबाबत काय म्हणाले नागपूरचे जिल्हाधिकारी.... वाचा

नीलेश डोये
मंगळवार, 14 जुलै 2020

लॉकडाउन दोन, चार दिवसांचा नाही तर 20-25 दिवसांचा करावा लागेल. हा शेतीचा हंगाम आहे. ग्रामीण भागात शेतीचे काम सुरू आहे.

नागपूर : कोरोनाच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कामगार, मजुरांची चांगलीच अडचण झाली. अनेकांचा रोजगार आहे. लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे काही शहरात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले. नागपुरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लॉकडाउनमुळे सामान्यांची अडचण होत असल्याने अनेक जण याच्या विरोधात आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही याबाबत मत स्पष्ट केले आहे. 

केंद्रीय मंत्री म्हणाले, डिजिटल पद्धत निर्माण झाली की पारदर्शकता येते, भ्रष्टाचार संपतो, वाचा सविस्तर... 

"सकाळ'शी बोलताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले की, शहरी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ग्रामीण भागात हा आजार नियंत्रणात आहे. लॉकडाउन दोन, चार दिवसांचा नाही तर 20-25 दिवसांचा करावा लागेल. हा शेतीचा हंगाम आहे. ग्रामीण भागात शेतीचे काम सुरू आहे. काही भागात पेरणी सुरू आहे. तर काही भागात पीक आली असल्याने फवारणी आवश्‍यक आहे. बियाणे न उगवल्याने काहींना दुबार पेरणीची करावी लागली. लॉकडाउन केल्यास शेतकऱ्यांना बाहेर पडता येणार नाही. याचा थेट परिणाम शेतीवर होईल. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे ग्रामीण भागात लॉकडाउन करणे परडणारे नाही. ग्रामीण भागात लॉकडाउन करणार नसल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did the District Collector of Nagpur say about the lockdown