चार महिन्यांत शेतकऱ्याचा मृत्यू; मृताच्या पत्नीला अजूनही कर्जमाफीचा लाभ नाही

पुरुषोत्तम डोरले
Thursday, 26 November 2020

तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी मंदा कोंगे यांना काही कागदपत्रे तयार करून बँक व तहसीलला जमा करायला सांगितले. मंदा कोंगे यांनी कागदपत्रे जमा केली. तहसीलदारांनी पैसे सरकारकडून येताच तुमच्या खात्यात जमा होतील, असे सांगितले.

मौदा (जि. नागपूर) : राज्य सरकारने २०१९ मध्ये महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. यात जे शेतकरी कर्जमाफीमध्ये मोडले, त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. पण, काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि ते मृत्यू पावले, त्यांच्या पत्नीला अजूनपर्यंत लाभ मिळाला नाही. त्यांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विलास मधुकर कोंगे (रा. खंडाळा, ता. मौदा) यांनी २४ एप्रिल २०१८ ला बँक ऑफ बडौदा, धानला येथून एक लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. चार महिन्यांत शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण? 

यात विलास कोंगे यांच्या नावाचे कर्ज माफ झाले. नाव आले म्हणून शेतकऱ्याची पत्नी मंदा विलास कोंगे यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता ‘तुमच्या पतीचे नाव कर्जमाफीच्या यादीत आहे’, असे सांगितले.

तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी मंदा कोंगे यांना काही कागदपत्रे तयार करून बँक व तहसीलला जमा करायला सांगितले. मंदा कोंगे यांनी कागदपत्रे जमा केली. तहसीलदारांनी पैसे सरकारकडून येताच तुमच्या खात्यात जमा होतील, असे सांगितले.

क्लिक करा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

मात्र, बँकेत गेले असता पैसे आले नसल्याचे सांगण्यात आले. मंदा कोंगे यांनी कर्जाचे पैसे जमा होतील, असा विचार करून शेती केली; पण कर्जमाफीचे पैसे काही मिळाले नाही. आता कर्ज कसे भरावे, मुला-मुलींचे शिक्षण, मुलीचे लग्न कसे करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

सरकारने लक्ष देणे गरजेचे
पतीचे माफ झालेले कर्ज तक्रार क्र. ३१३४p०००३० असून आधार प्रमाणित होत नसल्याने मृताच्या पत्नीच्या खात्यावर पैसे जमा होण्यास कठीण होत आहे. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
- चंद्रशेखर कोंगे,
मृत शेतकऱ्याचा भाऊ

अधिक वाचा - पाण्याच्या कॅनलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; अवस्था बघून उपस्थितांच्या पायाखालची सरकली जमीन

निधी येताच खात्यात रक्कम जमा करण्यात येईल
बँकेत सदर शेतकऱ्याची कागदपत्रे मिळाली. सरकारकडून निधी येताच खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.
- विक्रांत मालवी,
व्यवस्थापक, बँक ऑफ बडौदा, धानला

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will farmer get loan waiver