केव्हा होणार आरटीईचे प्रवेश....वाचा

गुरुवार, 18 जून 2020

राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशासाठी राज्यातून 1 लाख 920 पाल्यांची निवड केली. तरीही 75 हजार 465 पाल्य प्रतीक्षा यादीत आहेत. नागपूरमधून 6 हजार 784 जागांसाठी 31 हजार 44 पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 6 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 17 मार्चला सोडत निघाल्यावर 21 मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हापासून आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे सोडतीत नाव आलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

नागपूर : शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शाळांमध्ये 25 टक्के प्रवेशासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. दोन ते तीन दिवसांत आरटीई प्रवेशाला राज्यात सुरुवात होणार आहे. निवड झालेल्या राज्यातील 1 लाख 920 विद्यार्थ्यांपैकी 17 मार्चला काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये 75 हजार 465 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाचे संदेश पाठविण्यात आले होते.

राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशासाठी राज्यातून 1 लाख 920 पाल्यांची निवड केली. तरीही 75 हजार 465 पाल्य प्रतीक्षा यादीत आहेत. नागपूरमधून 6 हजार 784 जागांसाठी 31 हजार 44 पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 6 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 17 मार्चला सोडत निघाल्यावर 21 मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हापासून आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे सोडतीत नाव आलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

दुसरीकडे सीबीएसई आणि काही नामवंत खासगी इंग्रजी शाळांमार्फत पालकांना संदेश पाठवून प्रवेशाचा हप्ता भरण्याची सूचना केली आहे. या प्रकाराने नेमका कुठे प्रवेश घ्यायचा हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे पालक दुहेरी पेचात आहे. आज, राज्य सरकारने यावर निर्णय घेत, सूचना जाहीर केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

प्रवेश प्रतिबंध हटल्यावरच
राज्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र, राज्यातील ज्या शहरांतील वस्त्या कोरोनामुळे प्रभावित झाल्या आहेत, त्या क्षेत्रातील शाळांमध्ये प्रतिबंद हटल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाचे ऍकेडमिक कॅलेंडर संकेतस्थळावर, ही महाविद्यालये सुरू होणार ऑगस्टमध्ये...

अशा आहेत सूचना

पालकांसाठी...
शाळेचा प्रवेशाबाबत मेसेज आल्यानंतर त्या दिनांकास सर्व मूळ आवश्‍यक कागदपत्रे व एक छायांकित प्रत शाळेला देणे, शाळेने दिलेल्या तारखांवर उपस्थित राहता येणे शक्‍य नसल्यास, शाळेला तसे कळवून पुढील तारखेची मागणी करणे, शाळेच्या मेसेजवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर बालकांचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या तारखेची खात्री करणे, दिलेल्या तारखेनुसारच पडताळणी केंद्रावर जावे, प्रवेशासाठी कागदपत्रांचे दोन संच करणे.

शाळांसाठी...
पालकांना प्रवेशासाठी तारखा मोबाईलवर पाठवून त्यांना गर्दी होणार नाही, या पद्धतीने बोलाविणे, प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर लावणे, पालकांकडून मुळ कागदपत्रासह एक प्रत घेत, ऑनलाइन नोंद करणे, तसेच पालकाकडे असलेल्या अलॉटमेंट पत्रावर तात्पूरता प्रवेश दिल्याची नोंद करणे, पालक स्थलांतरीत असल्यास दिलेल्या तारखेवर न आल्यास त्याला तीनदा संधी देणे, पालकांकडून हमीपत्र भरुन घेणे, विद्यार्थ्यांना तात्पूरता प्रवेश देताच, त्याला ऑनलाइन शिक्षण सुरू करावे, वर्गात बसण्याची परवानगी देणे.

इन्फोबॉक्‍स
राज्यातील जागा 1,00,920
सोडतीमधील निवड झालेले विद्यार्थी - 75,465
शहरातील जागा - 6,784
आलेले अर्ज - 31,044
निवड झालेले विद्यार्थी - 6,685