आज मुलाखती : कोण होणार नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू?, वाचा सविस्तर

Who will be the Vice Chancellor? Interviews today
Who will be the Vice Chancellor? Interviews today

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू पदासाठी अंतिम पाच उमदेवारांच्या उद्या शुक्रवारी (ता.६) ऑनलाइन मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखती झाल्यावर याच दिवशी नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीचा आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

निवड करण्यात आलेल्या ३० उमेदवारांपैकी कुलगुरू शोध समितीने अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवारांची निवड केली आहे. यानंतर ही नावे राज्यपालाकडे पाठविण्यात आलीत. यात नागपूर विद्यापीठाचे विद्यमान प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व माजी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे शर्यतीत तर नांदेड येथील डॉ. गणेशचंद्र शिंदे, नागपूर जिल्ह्यातील पण सध्या नॉर्वे येथे वास्तव्यास असलेले डॉ. मोहनलाल कोल्हे आणि मुंबई येथील डॉ. सुनील भागवत या उमेदवारांची निवड झाली आहे. या सर्व मुलाखती राज्यपाल घेत असून ऑनलाईन होणार आहेत. अंतिम पाच नावे जाहीर झाल्याने नवीन कुलगुरूंच्या नावावर विविध अंदाज बांधले जात आहेत.

विजय कुणाचा
गत काही वर्षात कुलगुरू निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने नागपूर विद्यापीठाच्या मुलाखतीलाही तसा संदर्भ दिला जात आहे. राज्यपालांना असलेली भाजपची पार्श्र्वभूमी आणि राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार यामध्ये कुणाचा पारा जड ठरेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अंतिम पाच उमेदवारांच्या राजकीय आणि सामाजिक व संघटनात्मक पार्श्वभूमिवर सध्या चर्चा सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com