का सुरू झाली नागपूरच्या डीआरएम कार्यालयात धावपळ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

बॉम्बस्फोट, आगीच्या घटनांमध्ये आगीवर नियंत्रणासह सहकाऱ्यांना मदत कशी करावी, याबाबतचे प्रात्यक्षिक याअंतर्गत दाखविण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानक देशातील अतिसंवेदनशील रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. लगतच असलेले डीआरएम कार्यालय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते. या ठिकाणी जाळपोळ, बॉम्बस्फोटसारख्या घटना किंवा पेट्रोल, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास काय उपाययोजना करावी, याचे प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी करून दाखविले.

नागपूर : कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय हादरले. आगीचे लोळ उठून कर्मचारी जखमी झाले. क्षणार्धात मदत पोहोचली. बचावकार्य सुरू झाले. इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित खाली उतरवून तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात आले. गुरुवारी हा घटनाक्रम रेल्वे कर्मचाऱ्यांनी अनुभवला. सुदैवाने ही खरी घटना नव्हती तर नागरी संरक्षण संघटनेनेचे ते "मॉकड्रील' होते.
नागरी संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागातर्फे हे मॉकड्रील करण्यात आले.

हाय दुर्बुद्धी  - ६५० रुपयांची लाच घेताना वनाधिकारी जाळ्यात

बॉम्बस्फोट, आगीच्या घटनांमध्ये आगीवर नियंत्रणासह सहकाऱ्यांना मदत कशी करावी, याबाबतचे प्रात्यक्षिक याअंतर्गत दाखविण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानक देशातील अतिसंवेदनशील रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. लगतच असलेले डीआरएम कार्यालय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते. या ठिकाणी जाळपोळ, बॉम्बस्फोटसारख्या घटना किंवा पेट्रोल, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास काय उपाययोजना करावी, याचे प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी करून दाखविले. आगीवर नियंत्रण, इमारतीवर अडकलेल्या जखमी सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या कवायती करून दाखविण्यात आल्या. घरी गॅसगळती होत असल्यास काय दक्षता घ्यावी, याबाबत माहिती देण्यात आली.
मॉकड्रीलसोबतच 20 ते 26 जानेवारीदरम्यान अजनीतील नागरी संरक्षण विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणही आयोजित केले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी नागरी संरक्षण संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. नागरी सुरक्षेच्या दृष्टीने ही संस्था महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी संघटनेला 25 हजारांचे पुरस्कार घोषित केले. याप्रसंगी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी, वरिष्ठ विभागीय दक्षता अधिकारी ए. बी. दाभाडे प्रामुख्याने उपस्थित होते. दाभाडे यांनी "सिव्हिल डिफेंस'च्या स्थापनेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. मॉकड्रीलसाठी एच. एस. रघुवंशी, अनिल पुराणिक, राहुल गजभिये, विवेक चाटे, अनिल चतुर्वेदी, जे. डी. झरबडे, संजीव जाधव यांचे सहकार्य मोलाचे ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why started a run at the DRM office in Nagpur?