राज्यात कोरोना औषधांचा तुटवडा का आहे?

Why there is shortage of Corona drugs in the state?
Why there is shortage of Corona drugs in the state?

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना उपराजधानीसह विदर्भातील वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. या गंभीर मुद्द्याकडे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने (डीबीए) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करीत लक्ष वेधले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने राज्यात कोरोना औषधांचा तुटवडा का आहे असा प्रश्न उपस्थित करीत केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावली असून एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

न्या. रवी देशपांडे व न्या. नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. डीबीएचे अध्यक्ष ॲड. कमल सतुजा यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक औषधांचा नागपूरसह संपूर्ण विदर्भात तुटवडा आहे. प्रशासकीय उपाययोजनासुद्धा पुरेशा नाहीत. संशयित रुग्णांना तपासणीसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते.

या त्रुटींमुळे अलीकडेच सुनील मिश्रा व ॲड. शशिकांत बोरकर यांचे निधन झाले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उपचारासाठी तयार केलेले कक्षांमधील जागा अपुरी ठरली आहे. एवढेच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केल्यात अहवालही वेगवेगळा येतो. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी वारेमाप शुल्क आकारले जात असल्याची बाब याचिकेत नमूद आहे. 

जीवनावश्यक औषधांसह पर्याप्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आदेश देण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. या प्रकरणात सेंट्रल ड्रग्ज स्टॅन्डर्ड कन्ट्रोल ऑर्गनायझेशन, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, मेडिकलचे अधिष्ठाता व मेयो अधिष्ठाता यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. 
(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com