आता तरी सुटेल का वनांचे ग्रहण?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

नक्षेत्रात गस्त घालणे, रोपवाटिकांची कामाऐवजी वनमजुरांकडून अधिकाऱ्यांच्या घरची कामे करून घेतली जात आहे. अंबाझरी जंगलाला आग लागल्यानंतर वनसंरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर वनवृत्तावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, वनसंरक्षण सोडून अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर 30 ते 35 वनमजूर घरकाम करीत असल्याचेही वृत्त "सकाळ'ने प्रकाशित केले.

नागपूर : वनाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घरकामे करणाऱ्या वनमजुरांना परत बोलावून तातडीने त्यांची अंबाझरी आणि सेमिनरी हिल्समधील गार्डनमध्ये नियुक्ती करा, असे निर्देश मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार यांनी दिले. यामुळे घरकाम करणाऱ्या वनमजुरांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पुढे आली.

हे वाचाच - त्याने थकविली लाखोंची उधारी आणि सापडला संकटात

वनक्षेत्रात गस्त घालणे, रोपवाटिकांची कामाऐवजी वनमजुरांकडून अधिकाऱ्यांच्या घरची कामे करून घेतली जात आहे. अंबाझरी जंगलाला आग लागल्यानंतर वनसंरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर वनवृत्तावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, वनसंरक्षण सोडून अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर 30 ते 35 वनमजूर घरकाम करीत असल्याचेही वृत्त "सकाळ'ने प्रकाशित केले. त्यामुळे वनसंवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्याची दखल नागपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार यांनी घेत गुरुवारी (ता. 16) तातडीने उपवनसंरक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यात अधिकाऱ्यांच्या घरी काम करणाऱ्या मजुरांना परत बोलवा, असे निर्देश दिले. वनमजुरांना घरकामासाठी नियुक्ती करता येत नाही, असे राज्यशासनाने लेखी कळविले आहे. तरीही नियमांचे उल्लंघन होत आहे. हे अयोग्य आहे. त्यामुळे कोणता वनमजूर कोणत्या अधिकाऱ्यांच्या घरी काम करीत आहे त्याचीही माहिती पाठवा, असे आदेश दिल्याने वनाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ती माहिती युद्धपातळीवर गोळा केली जात आहे. वनाधिकाऱ्यांना 3,500 रुपये खासगी नोकरदार नेमणुकीसाठी सरकारकडून पैसे दिले जातात. त्याचा उपयोग न घेता वनमजुरांकडून कामे करून घेतली जात असल्याने वनसंरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

गेल्या आठवड्यात उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्‍ल यांनी जंगलाच्या संरक्षणासाठी वनमजुरांची मागणी केली. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात कार्यरत दहा वनमजुरांना दहा जानेवारीला नागपूर वनविभागाकडे वर्ग केले. मात्र, अधिकाऱ्यांच्या घरी घरकाम करणाऱ्यांना वर्ग केले नाही. त्याबद्दलही मुख्य वनसंरक्षकांकडून विचारणा केली. माझ्या कार्यालयातील वनमजूर परत बोलवा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. अंबाझरी व सेमिनरी हिल्स येथील जंगलात या वनमजुरांना तैनात करा, काहीच्या रात्रीच्या गस्तही लावा, अशा सूचना दिलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the forest be eclipsed now?