तीन मुलांच्या आईला प्रियकराने दिला धोका अन्‌ झाले विपरित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

तीन मुलांच्या आईने प्रेमासाठी पतीला सोडले. त्याला सर्वस्व अर्पण केले. मात्र, प्रियकराने दुसरीसाठी तिला धोका दिला. खचलेल्या विवाहितेने शेवटी आत्महत्येचा निर्णय घेतला. 

नागपूर : दोन मुलांची आई असलेली विवाहिता युवकाच्या प्रेमात पडली. मुलांच्या भविष्याची आणि समाजाची चिंता न करता बिनधास्त प्रियकरासोबत संबंध ठेवले. संबंध नको तेवढे दूरही गेले. मात्र, प्रियकराला दुसरी मिळाल्याने पहिलीला दगा दिला. प्रियकराच्या या वर्तनामुळे खचलेल्या विवाहितेच्या मनात जीवनात अचानक अंधार आल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे तिने प्रियकराच्या नावाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या करीत जीवन संपविले. आशा टियर (35, रा. विश्‍वकर्मानगर) असे मृताचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, अशा हिला दोन मुले व एक मुलगी आहे. पती सोडून गेल्याने ती एकाकी जीवन जगत होती. इसासनी येथील रहिवासी अक्षय उके याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. अलीकडे आरोपी तिला टाळू लागला होता. आशाने अक्षयचे घर गाठले. लग्नासंदर्भात विचारणा केली. मात्र, अक्षयने लग्नास नकार दिला.

सविस्तर वाचा - अशी कशी कमी होत नाही... मी करून दाखवतो, वाचा...

अक्षयचा भाऊ दिनेश उके याने मारण्याची धमकी देऊन आशाला हुसकावून लावले. या प्रकाराने ती फारच व्यथीत झाली होती. बुधवारी (ता. 15) सकाळी तिने सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. मृत्युपूर्वी हातावर तसेच कागदावर सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यावरून पोलिसांनी तपासाअंती प्रियकर अक्षय व त्याचा भाऊ दिनेशविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित इमेज

क्षणिक सुखासाठी

प्रेमात जात-पात, वय आणि अन्य नात्यागोत्याची बंधने नसतात. त्यामुळे प्रेम कुणावरही केव्हाही होऊ शकते. सध्या विवाहितांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होऊन शारीरिक सुखासाठी संसार तोडल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. विवाहित महिलांना प्रेमजाळ्यात ओढणे तसेच पती घरी नसताना घरी जाऊन तिच्याशी मैत्री प्रस्थापित करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विवाहितांच्या संसाराला ग्रहण लागले आहे. आशा यांची अशीची कहाणी असून, क्षणिक सुखासाठी तिने संसार व मुलाकडे दुर्लक्ष करीत प्रियकराला जवळ केले होते. मात्र, प्रियकर शेवटी धोकेबाज निघाला.

काय झालं असावे ? - आठवडी बाजारासाठी ते गप्पा मारत निघाले आणि थरकाप उडाला, वाचा काय झाले...

सर्वस्व केले अर्पण

आशा हिने प्रियकराच्या प्रेमापोटी पैशासह आपले सर्वस्व अर्पण केले होते. मात्र, प्रियकराने तिच्या अतिविश्‍वासाचा गैरफायदा घेतला. तिच्याशी संबंध ठेवले आणि लग्नास नकार दिला. ज्या प्रियकराला आपण सर्व काही दिले त्याने आपल्याला दगा दिल्याचा पश्‍चाताप तिला झाला. त्यामुळे तिने जीवनयात्रा संपविली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women suicide in Nagpur