या निष्ठूर "वादळा'त आमचे पाल कसे वाचवायचे, या प्रश्‍नाचे उत्तर आहे तुमच्याकडे, पारधी बांधवांचा सवाल...

अनिल पवार
शुक्रवार, 12 जून 2020

स्वस्त धान्य दुकानातून मोफत  तांदूळ मिळाले. काहींना मिळालेच नाही. ना तेल, ना मीठ, ना मिरची, ना डाळ, मग काय नुसते तांदूळ खायचे, असा प्रसंग उद्भवला असल्याचे पारधी बेडयावरील बाल्या पवार या तरूणाने डोळयात पाणी आणून सांगितले. दुपारी तीव्र उन्ह असल्याने पाल बांधलेला निवारा गरम होतो. म्हणून झाडाखाली सावलीत बसणे व मिळेल त्यात उदरनिर्वाह करत जगणे, अशी पारधी बांधवांची स्थिती असल्याचे त्यांच्या एकंदर परिस्थितीवरून दिसून येत होते.

चांपा (जि.नागपूर) : दोन्ही सांजेला मिळेल त्यात कुटुंबाचा गुजारा करतो. कोण्या आमदाराचं वा खासदाराचं आमच्याकडे लक्ष नाही. ऑफिसर लोक दुर्लक्ष करतात. आमी माणसं नाही का बेटं?असा एकंदर प्रशासनाच्या कामगीरीवर सवाल करणा-या व परिस्थितीने क्षीण झालेल्या माणसांच्या प्रतिक्रिया काळजाला घर करणा-या आहेत.

हेही वाचा : दगडी चाळीतून खासगी गाडीने नागपूरकडे निघाला "डॅडी', मात्र शहरात पोहोचताच...

सरपंचांपुढे समस्यांचा पाढा
पारधी बांधवांपैकी काहींनी आज काही शासकीय कामानिमित्त सरपंच अतिश पवार यांच्यासोबत तहसील गाठले. परंतु परतीच्या प्रवासात राजुलवाडी गाव नजीकच्या परिसरात काही कुटुंबे पाल टाकून वास्तव्य करीत असल्याचे चित्र दिसले. सोबतच पालावर काही बालके खेळात रमलेली दिसली. सरपंच अतिश पवार पालावर पोहचताच अचानक वादळ सुटले. एक महिला राहण्यासाठी पाल ठोकण्यात व्यस्त होती. पाल वादळामुळे उडत होते. बालके पालाच्या आत पटापट जाउन लपली. सोबतच वृध्दही होते. हे पालावरचे जिणे पाहून मन भरून यावे, असे ते दृश्‍य होते. काही वेळानंतर वादळ शांत झाले व महिलांसोबतच काही वृध्द सरपंच पवार यांच्यापुढे समस्या मांडू लागले.

आणखी वाचा : ब्यूटी पॉर्लर बंद आहेत !घरीच वाढवा सौंदर्य

काम नाही. परिणामी दाम नाही
उमरेड तालुक्‍यातील उदासा नजीकच्या वास्तव्यास असलेल्या पारधी समाजबांधवांच्या कुटुंबीयांवर बिकट प्रसंग आला आहे. राजूलवाडी पारधी बेड्यातील कुटुंबीयांवर लॉकडाऊन काळात त्यांच्याच शब्दांतून, दोन्ही सांजेला मिळेल त्यात गुजारा करण्याची वेळ आली असल्याची बाब समोर आली आहे.
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा करीत राज्यात संचारबंदी लागू केली. लॉकडाउनच्या काळात देशभरात सर्व काही ठप्प असून मोलमजुरी करुन  उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबीयांना हाताला काम नाही. परिणामी दाम नाही, जंगल शिकारीवर पोट भरणाऱ्या काहींना वन विभागाकडून चांगलाच फटका बसला. शासनाने शिकारीवर बंदी घातली. आता जगायचं कसं, हाच प्रश्न पडला आहे. परंपरागत व्यवसाय करून शिकारीवर कुटुंबीयांची उपजीविका भागवण्यासाठी जंगलात शिकार करण्यासाठी सतत भटकंती करीत काही कुटुंबे राजुलवाडी गाव नजीकच्या परिसरात पारधी कुटुंबे पाल टाकून पाच ते सहा वर्षापासून स्थिर झाली.

आणखी वाचा : काटोलमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे सुनील शिंदे

लॉकडाउनने सारेच थांबले
सरपंच सायेब आम्हाला खायला काही दया हो. आम्हाला उपाशी पोटी रात्र काढावी लागते. आमचे पोंरं व आम्ही पांढरा भात खाऊन कसेबसे जगत आहोत. सरपंच साहेब, लॉकडाऊनपूर्वी आम्ही परिसरातील गावागावात जाऊन शिळी भाकर, भाजी मागतो तर कधी. पेसे मागणे, खायला मागणे, वेळप्रसंगी पत्राळीवरील अन्न गोळा करणे, सोबतच मोठमोठ्या शहरात जाऊन पेैसे मागणे, या गोष्टींवर आम्ही संसाराचा गाडा हाकत असतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्व काही बंद पडले. त्यामुळे आता समस्यांशी सामना करीतच जगावे लागते, हे ऐकूण कोणाच्याही ह्रदयाला पाझर फुटावे, अशी स्थिती पारधी बांधवांची आहे.

राशन कार्ड तयार करून देण्याचे आश्‍वासन
या सर्व व्यथा सरपंच अतिश पवार यांनी उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे मांडल्या असता तहसिलदारांनी लगेच जवळ असेल इतके कागदोपत्री घेऊन या, आपण सर्व कुटुंबांना तात्काळ राशनकार्ड तयार करुन राशन दुकानातून धान्य उपलब्ध करुन देउ, असे आश्‍वासन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You have the answer to the question of how to save our sails in this cruel "storm".