आईला केली मारहाण...नंतर झाला पश्‍चाताप, उचलले टोकाचे पाऊल

अनिल कांबळे
Wednesday, 4 November 2020

आयुष वासनिक हा बेरोजगार होता. वाईट संगतीमुळे त्याला दारू आणि गांजाचे व्यसन लागले. मिळेल ते काम केल्यानंतर दारू पिऊन घरी आल्यावर तोडफोड करीत होता. त्याची आई धुणीभांडी करते तर वडील हातमजुरीला जातात. लहानभाऊ शिक्षण घेत आहे. 

नागपूर  ः दारूच्या नशेत घरी आलेल्या १८ वर्षीय मुलाने वृद्ध आईला जेवण बनविण्यावरून मारहाण केली. नंतर त्याला पश्‍चाताप झाला. आईला मारहाण केल्याची चूक लक्षात आल्यामुळे मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आयुष अरुण वासनिक (रा.अंगुलीमालनगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष वासनिक हा बेरोजगार होता. वाईट संगतीमुळे त्याला दारू आणि गांजाचे व्यसन लागले. मिळेल ते काम केल्यानंतर दारू पिऊन घरी आल्यावर तोडफोड करीत होता. त्याची आई धुणीभांडी करते तर वडील हातमजुरीला जातात. लहानभाऊ शिक्षण घेत आहे. 

ठळक बातमी - धमक्या मिळतात, पण मी जीवाला भीत नाही; शेवटपर्यंत ओबीसींसाठीच लढणार - वडेट्टीवार 
 

मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आयुष दारू पिऊन घरी आला. त्याने जेवण बनविण्याच्या कारणावरून घरात तोडफोड केली. भांडी फेकली. दरम्यान कामावर गेलेली आई घरी आली. त्याने आईशी भांडण केले. त्यानंतर तिला मारहाण केली. आई घराबाहेर रडत बसली होती. तो घराबाहेर आला. आईला मारहाण केल्याचा त्याला पश्‍चाताप झाला. त्यामुळे तो पुन्हा घरात गेला. त्याने घराचे दार बंद केले. 

सिलिंग फॅनला दोरी बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारी राहणारी महिला आयुषच्या आईची समजूत घालण्यासाठी घरी आली. त्यावेळी तिला घरात आयुष गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आई वडीलांनी लगेच घरात धाव घेतली. आयुषला खाली उतरवून रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the young boy committed suicide by strangulation