आयआयटीचा प्रवेश हुकला आणि तरुण जीवाला मुकला; नैराश्यात संपवले जीवन 

Young boy end his life as he could not Clear IIT exam
Young boy end his life as he could not Clear IIT exam

नागपूर ः आयआयटीला नंबर न लागल्याने नैराश्‍यात गेलेल्या हुशार विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगलवारी दुपारी मानकापुरात उघडकीस आली. आयुष अजयकुमार यादव (१९, बाबा फरीद नगर) असे आत्महत्या केलेल्या युवा अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार यादव हे रेल्वे विभागात अधिकारी आहेत तर पत्नी पूनम या रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना आयुष एकुलता एक मुलगा होता. तो अभ्यासात अत्यंत हुशार होता. दहावी आणि बारावीत तो मेरीट आला होता. त्याने नुकताच आयआयटीची परीक्षा दिली होता. मात्र त्याचा एका गुणाने आयआयटीला नंबर लागला नाही. त्यामुळे तो नैराश्‍यात गेला होता. 

आयआयटीला नंबर न लागल्याने त्याला अतीव दुःख झाले होते. तो आईकडे वारंवार नंबर हुकल्याची खंत बोलून दाखवत होता. मात्र, आई त्याचे सांत्वन करून युपीएसीची तयारी करण्यासाठी प्रोत्साहीत करून त्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करीत होती. तर वडील त्याला अनेकदा ते विसरून नव्याने अभ्यासाला लागून आपल्या करीयर कडे लक्ष देण्यास सांगत होते. त्यामुळे त्याला आई वडीलाचा आधार वाटायचा. 

तो सध्या रामदेवबाबा महाविद्यालयात इंजिनिअरींगच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. शिक्षणात रमत असतानाच त्याला आयआयटीत नंबर न लागल्याची खंत सतावत होती. त्यामुळे अनेकदा घरात स्वतःला कोंडून घेत विचार करीत बसत होता. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता आई कॉलेजला गेली आणि वडील रेल्वे कार्यालयात गेले असता घरी कुणी नसल्याची संधी साधून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com