नागपूर ब्रेकिंग : भांडेवाडीतील तरुणाचा कोरोनाने मृत्यू

young man died Corona in Nagpur Bhandewadi area
young man died Corona in Nagpur Bhandewadi area

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत वाढत असतानाच मृत्यूचा टक्कादेखील हळूहळू वाढत आहे. रविवारी झालेल्या मृत्यूनंतर मंगळवारी (ता.7) एका 45 वर्षीय तरुणाचाही कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. मंगळवारी 41 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतून पुढे आले. त्यामुळे बाधितांचा आकडा 1835 वर पोहचला. शहरात 27 व्या मृत्यूची नोंद झाली.

भांडेवाडी येथील रहिवासी असलेल्या या युवकाला 5 जुलै रोजी मेयोत दाखल केले होते. दारुचे व्यसन असलेल्या युवकाला श्‍वसन यंत्रणेचा क्षयरोग झाला होता. मागील अनेक दिवसांपासून त्याला क्षय असल्याची माहिती होती. दरम्यान, फुप्फुस निकामी होत असल्याचे डॉक्‍टरांनी यापूर्वीच सांगितले होते.

त्यातच या युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी मेयोतील प्रयोगशाळेने दिला होता. यामुळे युवकाला तत्काळ मेयोच्या कोविड अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. उपचार सुरू झाले, मात्र उपचाराला दाद मिळत नसल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी हा युवक दगावला. मृतकाची संख्या 27 वर पोहचली आहे.

शहरात मंगळवारी 41 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल एम्स, मेडिकल आणि मेयोतील प्रयोगशाळेतून पुढे आला. यामुळे कोरोनाची संख्या 1835 वर पोहचली आहे. मेयोतील प्रयोगशाळेतून मंगळवारी आलेल्या बाधितांच्या अहवालात काटोल, हसनबाग, बजेरिया, रामदासपेठ, अजनी, सोमलवाडा, जूनी मंगळवारी, बजेरिया, लकडगंज, धरमपेठ टांगा स्टॅंडसह नारा येथील व्यक्तीचा समावेश आहे. तर एम्सयेथील प्रयोगशाळेतून पाचपावंली येथील विलगीकरणात असलेल्या 15 तर एम्सच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणीला आलेल्या एका व्यक्तीचे नमूने कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय मेडिकलच्या प्रयोगशाळेतून 3 तर खासगी प्रयोगशाळेतून दोघांचे नमूने बाधित असल्याचा अहवाल पुढे आला.

  • -उपराजधानीत 27 व्या मृत्यूची नोंद
  • -मेडिकल 13 तर मेयोत 14 मृत्यू
  • -30 जून रोजी 1535 बाधित रुग्ण होते
  • -जुलैच्या 7 दिवसांत 330 कोरोनाबाधितांची भर
  • -सरोजनगर, अवधूतनगर कोरोनाच्या नकाशावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com