esakal | आई आणि ताई तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा, अशी चिठ्ठी लिहून युवकाने उचलले टोकाचे पाऊल, वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

Youth commits suicide by wishing Nagpanchami

रोहित शुक्रवारी रात्री आठ वाजता गांधीसागर तलावाकडे आला. त्याने जीवाच्या भीतीपोटी गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी जगदीश खरे यांना तलावात तरंगताना युवकाचा मृतदेह दिसला. त्यांनी लगेच मृतदेह बाहेर काढून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

आई आणि ताई तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा, अशी चिठ्ठी लिहून युवकाने उचलले टोकाचे पाऊल, वाचा...

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कामधंदा बंद असल्यामुळे तो मित्राकडे दोन दिवस राहायला गेला. "तेरे को मैने खाना खिलाया, नाश्‍ता दिला औरा खर्रा भी दिया... अब तू मुझे चोरी करमें मदत कर' असं म्हणत मित्राने बळजबरी केली. मदत न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून युवकाने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. रोहित आसोले (वय 25) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आसोले हा गोपालनगर, दुसरा बसस्टॉप परिसरात राहतो. त्याला आई व बहीण आहे. लॉकडाउनमुळे त्याच्या हाताचे काम गेले. त्यामुळे तो बेरोजगार झाला. घरची आर्थिक स्थिती हलाखिची असल्यामुळे खायचेसुद्धा वांदे झाले होते. त्यामुळे तो गेल्या तीन दिवसांपासून घरीसुद्धा गेला नव्हता. या दरम्यान त्याला श्रद्धानंदपेठ, लक्ष्मीनगरात राहणारा मित्र डकाह चौर हा मित्र भेटला. त्याला रोहितने आपली आपबिती सांगितली. त्यामुळे दोन दिवस त्याने आपल्या घरी ठेवले. त्याला जेवणे, नाश्‍ता, चहा-पाणी दिले.

अधिक वाचा - ते तुकाराम मुंढे आहे... डोळ्यांत धूळ फेकणे कठीणच, वाचा संपूर्ण प्रकार

शुक्रवारी सायंकाळी त्याने रोहितला एका प्लान सांगितला. "माटे चौकात असलेले सात लोखंडी अँगल कचरा गाडीत टाकू. ते अँगल रामनगरातील एका भंगारवाल्याला विकू' असे बोलून चोरी करण्यास मदत मागितली. मात्र, रोहितने चोरी करण्यास नकार दिला. त्यामुळे डकाह याने त्याला घरात घुसून ठार मारण्याची धमकी दिली. "तेरे को मैने खाना खिलाया, नाश्‍ता दिला औरा खर्रा भी दिया... अब मुझे दोन हजार रुपये लौटा दे... वर्णा मार डालूंगा' अशी धमकी दिली. 

रोहित शुक्रवारी रात्री आठ वाजता गांधीसागर तलावाकडे आला. त्याने जीवाच्या भीतीपोटी गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी जगदीश खरे यांना तलावात तरंगताना युवकाचा मृतदेह दिसला. त्यांनी लगेच मृतदेह बाहेर काढून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे.

अधिक वाचा - 'ती' म्हणाली, आता तू माझी बायको आणि माझ्या नवऱ्याचीही... 

आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईट नोट

"आई तुझी मला खूप आठवण येणार... ताई आणि जीजूची पण आठवण येणार. आई आणि ताई तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा..' अशी सुसाईड नोट लिहून रोहितने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. 

संपादन - नीलेश डाखोरे