तरुणाईच्या मुखी एकच आवाज काय पो चे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

पतंग उडविण्याचा मोह लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच होतो. त्यामुळे पूर्वी मांजा तयार करणारी मंडळी आता बाजारातून रेडिमेड मांजाची खरेदी करताना दिसून येतात. जुनी शुक्रवारी, इतवारी, महाल, सीताबर्डी आणि गोकुळपेठसारख्या बाजारापेठांमध्ये संक्रांतीनिमित्त पतंगांची दुकाने सजली आहेत. महागाईचे पतंगोत्सवावर सावट असले तरी, एका दिवसाच्या आनंदसाठी मांजा आणि पतंगाची खरेदी करण्यासाठी दुकानात तरुणाईने गर्दी केल्याचे दिसून आले. 

नागपूर : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सजली आहेत. दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगांची गर्दी वाढत आहे. संक्रांतीनिमित्त रविवारी पतंगांच्या दुकानात मोठी गर्दी दिसून आली. रेडिमेड मांजा आणि डझनाने पतंग खरेदी करताना दिसून येत होती. बाजारात सलग दोन दिवस आता रात्रभर पतंगांची दुकाने सुरू राहणार आहेत. 

पतंग उडविण्याचा मोह लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच होतो. त्यामुळे पूर्वी मांजा तयार करणारी मंडळी आता बाजारातून रेडिमेड मांजाची खरेदी करताना दिसून येतात. जुनी शुक्रवारी, इतवारी, महाल, सीताबर्डी आणि गोकुळपेठसारख्या बाजारापेठांमध्ये संक्रांतीनिमित्त पतंगांची दुकाने सजली आहेत. महागाईचे पतंगोत्सवावर सावट असले तरी, एका दिवसाच्या आनंदसाठी मांजा आणि पतंगाची खरेदी करण्यासाठी दुकानात तरुणाईने गर्दी केल्याचे दिसून आले. 

Image may contain: 2 people, people sitting

यावर्षी थेट 4 रुपये प्रतिनग या दरापासून पतंगाची सुरुवात असून जवळपास 1200 रुपये डझनपर्यंतच्या पतंगी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सहा, नऊ आणि बारा तार मांजाची चकरी उपलब्ध आहे. त्यासाठी चारशे ते बाराशे रुपयापर्यंत पैसे मोजावे लागणार आहे. याशिवाय आकर्षक चायनीज पतंगही बाजारात आला आहे. त्याची किंमत 150 ते 250 रुपये प्रतिडझन आहे. यावर्षी बाजारात पतंगांच्या किमती महाग असल्या तरी, त्याची विक्री कमी झालेली नसून, रविवारपासून बाजार रात्रभर सुरू राहणार आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक गर्दी बघायला मिळेल अशी माहिती रमेश पतंग स्टोर्सचे रमेश जैस यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

'नायलॉन मांजा मागू नका'

दोन वर्षांपासून राज्यात नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, संक्रांतीनिमित्त नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. यासंदर्भात पोलिसांकडून विविध ठिकाणी धाडी टाकण्यात येत असल्या तरी, मुळत: त्याचे उत्पादन करणे बंद होत नसल्याने ताजबाग, गोकुळपेठ, सीताबर्डी, जुनी शुक्रवारीतील काही भागात त्याची विक्री होत आहे. मात्र, नायलॉन मांजा घातक असल्याने विक्रेत्याला नायलॉन मांजा मागू नका, असे आवाहन दै. सकाळतर्फे करण्यात येत आहे. 

सविस्तर वाचा - विद्यार्थी, खेळाडूंसाठी 'युथ होस्टेल', काय राहील सुविधा?

सावधगिरी बाळगा

संक्रांतच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडविताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. शहरी भागात वीज वितरणाच्या लघु व उच्चदाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेली पतंग विजेचे तार, खांबांवर अडकते. अशावेळी काही जण अडकलेली पतंग काढण्यासाठी काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोटचा वापर करतात. अशाप्रसंगी अनेकदा जिवंत विद्युततारेला स्पर्श होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अडकलेली पतंग काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न जिवावर बेतू शकतो. अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Image may contain: drink

हे लक्षात ठेवा

  • वीजतारांवार अडकलेली पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते 
  • तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये 
  • अडकलेली पतंग किंवा मांजा काढायला रोहित्रावर चढू नये 
  • धातूमिश्रित अथवा नॉयलॉनचा मांजा टाळावा 
  • वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा 
  • तारांत अडकलेला पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये 
  • पतंग उडविणाऱ्या पाल्यांकडे पालकांनी लक्ष द्यावे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth Crowds rush to shop for kites