व्याहाड गावात भरते कोरोनाकाळात 'शाळेबाहेरची शाळा', वाचा सविस्तर...

Youth initiatives for student education at Nagpur gramin
Youth initiatives for student education at Nagpur gramin

धामणा लिंगा (जि.नागपूर): नजीकच्या व्याहाड गावात विभागीय आयुक्तांच्या प्रेरणेने "शाळेबाहेरची शाळा' हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील "टास्क' पोहोचविण्याचे कार्य गावातील युवक करीत आहेत. तसेच गावामध्ये मुलांच्या इयत्तेनुसार शिक्षण देणे सुरू झाले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाउन करण्यात आले. दरम्यान, सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घरी राहूनच अभ्यास करावा व अभ्यासात सातत्य टिकून राहावे, या अनुषंगाने सरपंचांच्या पुढाकाराने गावांमध्ये पालकांचे "व्हॉट्‌सऍप ग्रुप' तयार करून दररोज मुलांना अभ्यास दिला जात आहे. तसेच मुलांच्या क्षमतेनुसार इयत्ता पहिली ते पाचवी यानुसार मुलांसाठी अभ्यास तयार करण्यात आले आहे. यामध्ये इयत्तेनुसार भाषा मराठी व गणित या विषयाचे "व्हॉट्‌सऍप ग्रुप'द्वारे पालकांना पाठविण्यात येत आहे.

भिंती झाल्या बोलक्‍या
मुलांच्या शैक्षणिक विकासाकरिता गावात शैक्षणिक बोलक्‍या भिंतीचा उपक्रम गावात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व शैक्षणिक विकासात आवड, रुची निर्माण व्हावी, त्यांना सहज व सोप्या पद्धतीने व खेळीमेळीच्या वातावरणातून शिक्षण घेता यावे. या अनुषंगाने ग्रामपंचायतअंतर्गत बोलक्‍या भिंती हा उपक्रम राबविला. शाळेच्या परिसरातील व गावातील सर्व भिंतींवर विविध विषयांवर आधारित प्रमुख अभ्यासक भिंती रेखाटत आहेत. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिकण्यास मद्दत होत आहे. गावातील भिंतींवर विविध विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त होईल आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती रेखाटण्यात आली आहे.

चालताबोलता शिक्षण
बाराखडी, गणितीय सूत्रे, समीकरणे व अपूर्णांकाच्या आकृती, शाब्दिक उदाहरणे, भाषा विषय सोपा परिच्छेदवरून माईंड मॅप इत्यादी विषयांवर आता गावातील मुले हसत-खेळत येता-जाता वाचतात व मुलांमध्ये व गावामध्ये एक शैक्षणिक वातावरणात निर्माण झाले. या शैक्षणिक उपक्रमाला उंच भरारी देणाऱ्या सरपंच विठोबाजी काळे, गुरू तिरनकर, स्वयंसेवक महेश चौरे, तेजस भिवगडे, प्रतीक लांजेवार, कुणाल जुनघरे, संकेत ठाकरे, अंकिता बावणे, आकांशा लेंडे, प्रगती चौधरी, भाग्यश्री बनकर, शिवानी क्षीरसागर आदी परिश्रम घेत आहेत.

संपादन - विजय राऊत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com