हॉटेलात पोळ्या लाटणाऱ्या अल्पवयीन मुलीस पळविले!

girl
girl

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : हॉटेल वर काम करत असलेल्या अल्पवयीन मुलीस हात धरून फरफटत नेत फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मंडपगाव येथील एका युवका विरुद्ध अंढेरा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.


पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सरंबा फाट्यावर एका हॉटेलमध्ये सोमवार (ता.१८)अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह काम करीत होती. रात्री नऊच्या दरम्यान सदर मुलगी पोळ्या टाकत असताना मंडपगाव येथील समीर अज्जूखान पठाण हा युवक हॉटेलमध्ये आला. मुलीस हात धरून जबरीने फरफटत नेत असताना मुलीच्या आईने विरोध केला असता त्यांना धक्का देऊन ढकलले व दुचाकीवर बसवून सदर मुलीस पळवून नेले सदर घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी अज्जू पठाण यांच्या घरी जाऊन आरोपी समीर पठाण व सदर मुलीची विचारपूस केली दरम्यान रात्रभर व आज दुपारपर्यंत शोधाशोध करूनही सदर अल्पवयीन मुलगी मिळून आली नाही.

आरोपीस अटक
याबाबत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी मंगळवारी (ता.१९) अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणे व मारहाण केल्याप्रकरणी समीर अज्जूखान पठाण राहणार नवीन मंडपगाव याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात ठाणेदार एन.जी.ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेड कॉन्स्टेबल शाकीर यासीन पटेल तपास करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com