अनेक जनावरे गेली पुरात वाहून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

उमरेड /नांद (जि.नागपूर) :  बुधवारी (ता. 4) दुपारी एकच्या सुमारास नांद नदीच्या पात्रात पाणी वाढल्यामुळे महालगावलगत असलेल्या नदीवरील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामातील सेंन्ट्रिंगमध्ये अडकून अनेक जनावरांचा मृत्यू झाला. काही गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे कळते.

उमरेड /नांद (जि.नागपूर) :  बुधवारी (ता. 4) दुपारी एकच्या सुमारास नांद नदीच्या पात्रात पाणी वाढल्यामुळे महालगावलगत असलेल्या नदीवरील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामातील सेंन्ट्रिंगमध्ये अडकून अनेक जनावरांचा मृत्यू झाला. काही गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे कळते.
सकाळच्या सुमारास नदीला पूर नसल्याने शेतकरी व गुराख्यांनी जनावरे जंगलात चारण्याकरीता नेली होती. जनावरे परत आणताना नदीला पूर असल्याने जनावरे रोखणे शक्‍य झाले नाही. नदी पात्रातून गुरे बाहेर काढीत असताना काही गुरे पूरात वाहून गेलीत. वाहून जात असलेली जनावरे काढण्यासाठी ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केले. पण पाण्याला ओढ असल्यामुळे प्रयत्न अपुरे पडले. नारायण भोयर, मारोती भोयर, सुनिल जिवतोडे, दादा वांगे, नारायण वांगे इत्यांदीची जनावरे पूरात वाहून गेल्याचे सांयकाळी सरपंच प्रशांत राऊत यांनी सांगीतले. 10ते 15 जनावरे वाहून गेलीत. परंतु इतर मालकांची नावे कळू शकली नाहीत. महालगाव नदीवरील पुलाचे बांधकाम गेल्या 10 महिन्यांपासून सुरू आहे. ते अजुनही पूर्ण होऊ शकले नाही. या मार्गावरील वाहतुकीकरीता बाजूने कच्चा वळण रस्ता तयार केला, पण तो पुरामुळे वाहून गेल्याने ही घटना घडली. सकाळच्या सुमारास नदीला पर्यायी बनवलेल्या रस्त्यावरून कर्मचारी वर्ग व इतर नागरिक आपल्या कामाकरीता कर्तव्यावर कसेतरी गेले होते. नंतर पाऊस जास्त पडल्यामुळे नदीला पुर आला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. या मार्गावरील हिंगणघाट, गिरड, बेला, उमरेड, नागपूर, चिमु कडे येजा करणा-या बसेस व त्यातील प्रवाशांना दिवसभर ताटकळत राहावे लागले. बुधवार असल्याने सिर्सी येथे आठवडी बाजार भरतो. त्यालाही"खो' बसला .ते सांयकाळ पर्यंत अटकलेले होते.अशातच जनावरेही वाहुन गेलीत.
.बचावकार्यात विलंब
अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीमुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली असून अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटल्यामुळे बचावकार्यात विलंब होत असल्याचे चित्र आहे. सततच्या पावसाने ओढावलेल्या पूरपरिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर ओसरल्यावरच पुरात वाहून गेलेल्या आणि मृत पावलेल्या जनावरांची अधिकृत संख्या निश्‍चितपणे सांगता येईल, असे गावकरी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: अनेक जनावरे गेली पुरात वाहून