अवैध माती उत्खननात 19 लाखांचा दंड

file photo
file photo

कन्हान (जि.नागपूर)  : कन्हान नजीकच्या एमआयडीसी अधिग्रहित जागेवरील अवैध माती खनन प्रकरणातील आरोपी ट्रॅक्‍टरमालकावर 19 लाख 6 हजारांचा दंड ठोठावला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू झाल्यानंतर कन्हान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून तहसीलदारांना अहवाल दिला होता. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
कन्हैया रामकेवल हरजन, गंगाप्रसाद शंकर जलहारे व शिवकुमार नागमन मनहारे या तिघांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला होता. तर दिनेश संतराम कारेक व सुरेश कनोजिया हे दोघे गंभीर जखमी झाले होते. मातीचे खनन करण्याप्रकरणी टॅक्‍टरमालक दीपक रामनगीना यादव (रा. पटेल नगर पिपरी, कन्हान) यास अटक केली होती. कन्हान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यासह महसूल विभागाला एमआयडीसीच्या जागेवर अवैध खोदकाम केल्याचा अहवाल दिला. महसूल विभागाने स्वतंत्र तपास करून सर्व्हे क्रमांक 40 आराजी 4.04 हेकटर आरमधून जखमी फिर्यादी दिनेश संतराम कारेक यानी घटनेतील मृतांच्या मदतीने दीपक यादव यांच्या सांगण्यावरून मालकीच्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीने मातीचे अवैध खनन व वाहतूक केल्याचे समोर आले. मागील वीस वर्षांपासून हे काम सुरू असल्याने साधारणतः 353 ब्रास माती चोरीला गेली असल्याचा अहवाल स्थानिक तलाठ्याने दिला. महसूल अधिनियमाच्या कलमानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी पाच हजार रुपये प्रती ब्रास माती असे चोरी केलेली सुमारे 353 ब्राससाठी 17 लाख 65 हजार रुपयांचा दंड ठोकला. यासोबतच त्यावरील रकमेचा दंड एक लाख 41 हजार 200 असे एकूण 19 लाख 6 हजार 200 रुपयांचा आर्थिक दंड तीन दिवसांच्या आत खजिना दाखल करण्याचे आदेश दिले. हा आदेश 28 ऑगस्ट रोजी काढल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीकडून दंडाची एकूण रक्कम भरल्या गेली नसल्यास थकबाकी म्हणून वसूल करण्यात येणार असल्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com