ऍग्रो कंपनीची तीन कोटींनी फसवणूक

file photo
file photo

नागपूर : जगदंबा रिअल इस्टेट लि. कंपनीचे संचालक कोंडावार बंधूंनी ऍग्रो कंपनीच्या नावे तीन कोटींचे कर्ज घेऊन कंपनीसह पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचीही फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
गोपाल कोंडावार (52) आणि संजय कोंडावार (48) दोन्ही रा. रामदासपेठ हे बिल्डर असून जगदंबा रिअल इस्टेट लि. कंपनी नावाने ते व्यवसाय करतात. दोन्ही भाऊ अमरावती मार्गावरील युनिक ऍग्रो प्रो. इंडियाचे 2010 ते 2012 दरम्यान व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. या कंपनीमार्फत शेतीशी संबंधित व्यवसाय केला जातो. एनियो ऍग्रो प्रोसेसर इंडिया लिमिटेड कंपनीसुद्धा युनिक ऍग्रो प्रो. इंडियासोबत संबंधित आहे. व्यवस्थापकीय संचालकांना संस्थेच्या नावे कर्ज घेता येते. त्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह इतरांच्या उपस्थितीत ठराव घ्यावा लागतो. कोंडावार बंधूंनी युनिक ऍग्रो कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्‍टरची 2 मे 2012 रोजी सभा घेतल्याचे दर्शविले. त्यात माजी अध्यक्ष, माजी व्यवस्थापकीय संचालक आणि अन्य दोन संचालकांच्या बनावट व खोट्या सह्या करून पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या गांधीबाग शाखेतून तीन कोटींच्या कर्जाच्या प्रस्तावाला मान्यता मिळवून घेतली. प्रत्यक्षात या ठरावाबाबत कोणालाही माहिती दिली गेली नाही. या ठरावाच्या आधारे आरोपींनी कर्जाचा प्रस्ताव मंजूर करवून घेतला. पुसद अर्बन ओ-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या गांधीबाग शाखेतच दुसरे खाते उघडून संपूर्ण रक्कम त्या खात्यात वळती करून घेतली. यानंतर ही रक्कम जगदंबा रिअल इस्टेट लि. कंपनीच्या खात्यात वळती करीत फसवणूक केली. युनिक ऍग्रो प्रो. इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक खुशाल गेडाम (85) रा. भरतनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com