नावापुरते स्वयंपाकघर पाेलिस वसाहतीला घरघर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

अकाेला : नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवा देणाऱ्या पाेलिसांचे कुटुंब ज्या अवस्थेच राहतात ती अतिशय विदारक अशी अाहे. या घरात नावापुरते स्वयंपाक घर असून, नवरा, बायकाे अाणि त्यांचे अपत्या वगळता चुकून घरात अाई-वडील जरी अालेत तर त्यांना ठेवायच कसं अशी परिस्थिती अाहे.

अकाेला : नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवा देणाऱ्या पाेलिसांचे कुटुंब ज्या अवस्थेच राहतात ती अतिशय विदारक अशी अाहे. या घरात नावापुरते स्वयंपाक घर असून, नवरा, बायकाे अाणि त्यांचे अपत्या वगळता चुकून घरात अाई-वडील जरी अालेत तर त्यांना ठेवायच कसं अशी परिस्थिती अाहे.

पाेलिस वसाहतीत प्रवेश करताच एक टुमदार घर नजरेत भरते हे घर साहेबांचे. या घरापासून समाेर गेलाे तर पाेलिस वसाहतीच्या चारही रांगा पाहिल्या तर घराची एन्ट्री ही सर्व्हिस लाईन मधून अाहे की काय असा प्रश्न पडताे. विशेष म्हणजे, या प्रत्येक घरात एन्ट्री ही सर्व्हिस लाईन मधुनच असल्याचे वास्तव धक्कादायकच. वसाहतीच्या सभाेवताली गाजर गवताचा कहर. घराच्या समाेर वाहणारऱ्या नालीत डुकरांचा गाेंधळ हे चित्र नेहमीचेच.

घराबाहेर वातावरण गलिच्छ असले, तरी घरात कितीही निटनेटकेपणा ठेवायचा प्रयत्न केला तरी पालथ्या घागरीवर पाणी अशीच अवस्था. वसाहतीत राहणाऱ्या काही गृहिणींनी व्यथा मांडतांना अमचं हे घर नावापुरतचं म्हणायला घर अाहे. शाैचालयाला दार अाम्हाला बसवावे लागले. अनेकांनी अर्धवट तुटलेल्या दारांना टिन टप्परचे ठिगळ लावले अाहेत दारांना ठिगळ नाही असे एकही घर या वसाहतीत सापडत नाही. घराचे दार उघडे असले की नालीती डुकरं घरातही शिरतात.

पाेलिसांचे घर अातून पाहीले तर नावापुरते स्वयंपाक घर अाणि त्याला लागून एक खाेली .त्या खाेलीत लाईट लागला नसेल तर रात्रीही अंधार अशी अवस्था. घरात प्रकाश यायला जागाच नाही. स्वयंपाकघर पाहिले तर हे स्वयंंपाक घर? असाच प्रश्न पडताे. स्वयंपाकाच्या अाेट्याची उंची ही जवळपास छाती पर्यंत. शेगडीवर ठेवलेल्या भांड्यांतील भाजी शिजली की नाही हे पाहण्यासाठी अनेकींना चक्क स्टुलचाच वापर करावा लागताे अशी परिस्थिती. घराच्या छतावर बल्ल्या सडल्याने त्यात हाेणाऱ्या अळ्या घरात पडतात. ज्या घराच लहान मुलं अाहेत त्यांना तर चांगलेच दक्ष राहावे लागते. अाम्ही दुरूस्तीवर खर्च तरी किती करावा असा सवाल येथील त्रस्त रहिवांशांनी केला अाहे.

पालकमंत्री घेणार का दखल?
जिल्ह्याचे पालमंत्री डॉ. रणजित पाटील हे गृहराज्यमंत्री अाहेत. त्यांच्या शहरात त्यांच्याच खात्याच्या कर्मचाऱ्याना राहण्याची साधी व्यवस्थाही धड नाही ही खटकणारी बाब अाहे. पाेलिसांसाठी नवीन वसाहतीचा प्रस्ताव अाल्याचे बाेलले जाते. जर खरच असा प्रस्ताव मंजूर झाला असेल तर पालकमंत्र्यांनी याकडे थाेडे लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षा पाेलिसांच्या कुटुंबियाची अाहे.

Web Title: नावापुरते स्वयंपाकघर; पाेलिस वसाहतीला घरघर