फवारणी करताना शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

सेलू (जि. वर्धा) : तालुक्‍यातील सुकळी स्टेशन लगतच्या लहान आर्वी येथे शेतात कपाशीवर फवारणी करताना शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. शंकर नामदेव लांबट (वय 42) मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता 28) घडली.

शंकर लांबट यांना दोन दिवसांपासून बरे वाटत नव्हते. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने प्रकृतीकडे दुर्लक्ष करून पावसाने उघाड दिल्याने ते शेतातील कपाशीवर फवारणी करण्याकरिता गेले होते. फवारणी करीत असताना सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते शेतातच पडून राहिले. गावातील दोन शेतकरी दुपारी 2 वाजता रस्त्याने शेतात जात असताना लांबट जमिनीवर पडून असल्याचे त्यांना दिसल्यानंतर घटना उघडकीस आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: फवारणी करताना शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

टॅग्स