माजी आमदार कृष्णराव पांडव यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

नागपूर : माजी आमदार आणि माजी महापौर कृष्णराव रामाजी पांडव यांचे रविवारी निधन झाले. मृत्युसमती ते 88 वर्षांचे होते. रविवारी (ता.23) धंतोली येथील निवास्थनावरून अंत्ययात्रा निघेल. दिघोरी येथील राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कर केले जाणार आहेत. कृष्णराव पांडव यांनी 1970 साली महापालिकेत पाऊल ठेवले. ते उपमहापौर होते. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष आणि 1973 साली महापौरपद भूषविले. 1981 साली जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

नागपूर : माजी आमदार आणि माजी महापौर कृष्णराव रामाजी पांडव यांचे रविवारी निधन झाले. मृत्युसमती ते 88 वर्षांचे होते. रविवारी (ता.23) धंतोली येथील निवास्थनावरून अंत्ययात्रा निघेल. दिघोरी येथील राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कर केले जाणार आहेत. कृष्णराव पांडव यांनी 1970 साली महापालिकेत पाऊल ठेवले. ते उपमहापौर होते. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष आणि 1973 साली महापौरपद भूषविले. 1981 साली जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले. बारा वर्षे त्यांनी विधान परिषदेत आमदार म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. नगरसेवक ते आमदार अशा राजकीय प्रवासात त्यांनी प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणीत विविध पदे भूषविली. सन्मार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. गरीब होतकरू आणि मागासवर्गातील मुलांना शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी या संस्थेमार्फत जवळपास 45 शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना करून भरीव कार्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वसंतराव साठे, निर्मलाबाई देशपांडे यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्यामागे गिरीश आणि किरण अशी दोन मुले, चार मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: माजी आमदार कृष्णराव पांडव यांचे निधन