अकोला - पुलावरील खड्ड्यात बुडून युवकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

अकोला : नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पुलाचे काम   बोरगांवमंजू शहराला लागून रामनगर नजिक सुरु होते. मात्र पावसाळा असल्याने पुलाचे काम रखडले. त्यामुळे पुलाच्या खड्ड्यात पाणी साचले आहे. याच खड्ड्यात एका 35 वर्षीय युवकाचा सोमवारी (ता. 30) सकाळी मृतदेह आढळून आला. 

बोरगावमंजू बाहेरून वाशिंबा ते वणीरभापुर शिवारापर्यंत नवीन बायपासचे सात ते आठ किमी अंतराचे काम सुरू आहे. मात्र रामजी नगर जवळून जाणाऱ्या महामार्गावर पुलाचे काम पावसाळ्यामुळे रखडले आहे.

सदर पुलाचे बांधकाम अंदाजे लांबी 25 फुट, रुंदी 70 फुट तर खोली 15 फुट येत असून याच खड्ड्यात पावसाळ्यातील पाणी साचले आहे. सोमवारी सकाळी या  पाण्यात एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची  माहिती पोलीसांना मिळताच घटनास्थळवर अशोक पितळे, पोलीस कर्मचारी ढोरे, नामदेव केंद्रे, देवराव भोजने यांनी धाव घेऊन मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर हा मृतदेह बाळु मोहन इंगळे (वय 35, रा. रामजी नगर बोरगाव मंजू) असे निष्पन्न झाले.

दरम्यान सदर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता सर्वोपचार रुग्णालयात दाखल केला आहे. दरम्यान या युवकाचा नेमका कसा मृत्यू झाला हे समजु शकले नाही.  पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्यासह पोलीस करीत आहेत.

Web Title: 1 dies due to big pit on bridge in akola