यवतमाळ : पुसदमध्ये स्वाईन फ्लूमुळे एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मार्च 2019

श्रीरामपूर (यवतमाळ) : शहरातील स्वाईन फ्लूने पुसद परिसरात पाय रोवले असून मंगळवारी( ता. 19) नागपूर येथे स्वाईन फ्ल्यू आजारावर उपचार घेणारा पुसद येथील एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागरीकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

श्रीरामपूर (यवतमाळ) : शहरातील स्वाईन फ्लूने पुसद परिसरात पाय रोवले असून मंगळवारी( ता. 19) नागपूर येथे स्वाईन फ्ल्यू आजारावर उपचार घेणारा पुसद येथील एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागरीकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

श्रीरामपूर लगत असलेल्या सप्तगिरी काॅलनीतील रहिवासी प्रकाश ज्ञानोबा काजळे (वय 51) असे रुग्णाचे नाव असून त्यांचे स्वाईन फ्ल्यू या आजाराने मंगळवारी (ता. 19) रात्री 8 वाजता नागपूर येथे उपचारा दरम्यान आकस्मित निधन झाले. यापूर्वी पुसद व श्रीरामपूर परिसरात तीन रुग्ण स्वाईन फ्ल्यूने दगावले असून रुग्णांच्या संख्येतील वाढीमुळे महानगरातील हा आजार नगरांसह ग्रामीण भागात पाय रोवत असल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याबरोबरच जनजागरण करण्याची मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे.

प्रकाश काजळे यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. 20) पुसद येथील स्मशानभूमीतील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.काजळे परिवारातर्फे प्रकाश काजळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोक्षधाम विकासासाठी 1 लाख रुपये देणगी जाहीर करण्यात आली.

ते पुसद येथील सत्यसाई सेवा समितीचे निमंत्रक व समिती प्रमुख होते. तसेच ते पुसद येथील प्रसिद्ध असलेले बालाजी स्विट मार्टचे संचालक होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, चार बहिणी, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, पुतणे, नातू असा बराच मोठा परिवार आहे.

Web Title: 1 dies due to Swine flue in Pusad