10 लिटर हवा, किंमत फक्त 550 रुपये!

file photo
file photo

नागपूर : स्वच्छ, ताजी, नैसर्गिक हवा घेण्यास आपण किती खर्च करू शकता, असे जर कोणी विचारले तर आपण त्याला नक्कीच वेड्यात काढू. कारण हवा ही सर्वांना मोफत आणि सर्वदूर उपलब्ध आहे. परंतु, औद्योगिकीकरणाचा प्रचंड वेग आणि हवामान बदलांमुळे मानवी जीवनाला वायुप्रदूषणाचा विळखा बसला आहे. यावरही तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पनेने मात केली असून नैसर्गिक हवा आता विशेष कॅनमध्ये ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. किंमत आहे एका श्‍वासाला 12.50 रुपये किंवा 10 लिटर कॅनला 550 रुपये फक्त.
स्वच्छ, ताजी हवा हा सर्वांचा जन्मजात अधिकार आहे. निसर्गानेच हा अधिकार सर्व सजीवांना बहाल केला आहे. परंतु शहरीकरण व विकासाच्या भन्नाट कल्पनांच्या मागे लागून मानवानेच वृक्षतोड, जंगलतोड करून निसर्गाचा ऱ्हास केला आहे. परिणामी ऋतुबदलांसह विविध प्रकारच्या प्रदूषणाचे संकट आ वासून उभे आहे. भारतातील अनेक शहरे विशेषतः दिल्ली एनसीआर क्षेत्रामध्ये वायू गुणवत्ता निर्देशांकाला (एक्‍यूआय) लाल रंगाने दर्शविण्यात आले आहे. जगातील प्रमुख धोकादायक वायू प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीसुद्धा आहे, हा त्याचा अर्थ. यावर काही वर्षांपूर्वी एक सामाजिक चळवळ किंवा प्रयोग म्हणून फ्रेश एअर कॅनद्वारे शुद्ध हवा मिळवावी, असा विचार पुढे आला. आता मात्र याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार होत असून शुद्ध हवा विकून पैसे कमविणे हा धंदा जोर पकडतो आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com