गडचिरोलीत १०० लिटर मोहसडवा नष्ट; महिला विक्रेत्यावर गुन्हा

गडचिरोलीत १०० लिटर मोहसडवा नष्ट; महिला विक्रेत्यावर गुन्हा

अहेरी (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील बुर्कमलमपल्ली येथील दारुविक्रेत्यांविरोधात (Liquor sellers) अहेरी पोलिस, मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्त कारवाई करीत शंभर लिटर मोहसडवा व दोन लिटर दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी रंजू अनिल आलाम या महिला दारुविक्रेत्यावर अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. तसेच बैठकीचे आयोजन करून पुन्हा गावात अवैध दारूविक्री केल्यास कायदेशीर करवाई करू, असे पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे (Police Inspector Praveen Dange) यांनी दारुविक्रेत्यांना ठणकावून सांगितले. (100 liters of Muhammad destroyed in Gadchiroli)

गडचिरोलीत १०० लिटर मोहसडवा नष्ट; महिला विक्रेत्यावर गुन्हा
कोविड हॉस्पिटलचे नाव मोठे दर्शन खोटे, तिन्ही आयसीयूतील वातानुकूलित यंत्रणा ठप्प

गावात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव संघटन, पोलिस पाटील व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त गाव परिसरात अहिंसक कृती करीत मोहसडवा नष्ट केला होता. सोबतच गावात सक्रिय असलेल्या दारुविक्रेत्यांना नोटीस बजावली होती. मात्र, गावातील काही मुजोर दारुविक्रेत्यांनी नोटीसची पायमल्ली करीत गोरखधंदा सुरूच ठेवला. त्यामुळे गावातील नागरिकांसह परिसरातील गावे त्रस्त झाली होती.

दारुविक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने नियोजन केले. त्यानुसार अहेरी पोलिस, मुक्तिपथ तालुका चमू, गाव संघटन, बचतगटाच्या महिलांनी एका घराची तपासणी केली. त्यावेळी घराच्या परिसरात दोन ड्रममध्ये जवळपास शंभर लिटर मोहसडवा व दोन लिटर दारू आढळून आली. घटनास्थळावर मोहसडवा, साहित्य नष्ट करीत दारूविक्रेत्या महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अहेरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. गावात पुन्हा दारूविक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक डांगे यांनी दारूविक्रेत्यांना ठणकावून सांगितले. यावेळी गाव संघटन सदस्य, बचतगटाच्या महिला, पोलिस पाटील व गावकरी उपस्थित होते. त्यामुळे गावातील व परिसरातील दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभाग घेणार पुढाकार

दारूबंदी प्रभावी करण्याच्या कार्यात वनविभागही पुढाकार घेणार आहे. आरमोरी वनपरिक्षेत्रातील काही जंगल परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे गाव संघटन दारुविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करू शकत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरवार व मुक्तिपथ तालुका चमूची बैठक पार पडली. यावेळी जंगल परिसरातील दारू अड्डे उद्‌ध्वस्त करण्यासाठी वनविभाग पुढाकार घेणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरवार यांनी दिली आहे.

दारू गाळण्याचे अड्डे

आरमोरी वनपरीक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पेटतुकूम, मोहटोला, अरसोडा या जंगल परिसरात दारूविक्रेत्यांनी दारू गाळण्याचे अड्डे निर्माण केले आहेत. मात्र, जंगल परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे गाव संघटनांच्या माध्यमातून अहिंसक कृती करण्यास अडचण निर्माण होत आहे. या संधीचे सोने करीत अवैध दारूविक्रेत्यांनी आपला व्यवसाय जोमात सुरू केला आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच बैठक पार पडली.

(100 liters of Muhammad destroyed in Gadchiroli)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com