103 वर्षांच्या आजींचा ठणठणीत योगाभ्यास 

दिव्या सहारे
गुरुवार, 21 जून 2018

नागपूर : आज शुगर, बीपी यासारख्या आजाराने तरुणांना ग्रासले आहेत. मात्र, बजाजनगरातील शंभरी पार केलेल्या मनोरमा सहस्रबुद्धे या वयातही ठणठणीत असून एकही आजार त्यांना अद्याप शिवलेला नाही. याचे गुपित योगासनामध्ये दडले असून त्या तब्बल 83 वर्षांपासून नियमित योगासने करीत आहेत. 

भारताने दिलेला योग आता जागतिक झाला आहे. त्याचे फायदेही आता अनेकांना पटू लागले आहे. मनोरमा सहस्रबुद्धे यांनी वयाची 103 वर्षे पूर्ण केली आहेत. मुळात एवढे वर्ष आयुष्य लाभलेली व्यक्‍ती फारच कमी आहेत. त्यातही एकाही आजार त्यांना जडलेला नाही किंवा अंथरुणातही त्या खिळून पडल्या नाहीत. तरुणांना लाजवेल एवढा त्यांच्यात उत्साह आहे. या वयातही दिवसभर सतत कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असतात. स्वयंपाकापासून तर अंगण झाडण्यापर्यंतची सर्व कामे करतात. त्यांना हे शक्‍य झाले नियमित योगासनाने. वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांना योगासनाचा ध्यास लागला. वयाच्या साठीपर्यंत त्या सूर्यनमस्कार घालीत होत्या. सकाळी 6 वाजता उठणे आणि प्राणायाम आणि इतर योगासने करणे ही त्यांनी स्वतःसाठी घालून दिलेली दैनंदिनी आजही तशीच सुरू आहे. 

आईचा उत्साह ऊर्जा देतो 
आजींना तीन मुले आणि दोन मुली आहेत. उन्हाळ्यात त्या मुलाकडे तर पावसाळा आणि हिवाळ्यात त्या नागपुरातील दुर्गा पारखी या त्यांच्या मुलीकडे राहतात. त्यांची मुलगी आज 75 वर्षाच्या आहेत. त्यांना उच्च रक्‍तदाबाचा त्रास आहे. वयामुळे त्यांना योगासने करणे शक्‍य होत नाही. मात्र, आजी नित्यनेमाने योग करतात. आईचा उत्साह आम्हाला ऊर्जा देतो, अशी त्यांची मुले सांगतात. 
 
Web Title: 103-year-old grandmother's yoga