स्वाइन फ्लूचा प्रकोप

स्वाइन फ्लूचा प्रकोप

नागपूर - स्वाईन फ्लू ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. नागपूर विभागात स्वाइन फ्लूने १०४ जण बाधित झाले आहेत. यातील ४१ जण उपराजधानीतील विविध रुग्णालयात भरती असून, दोघांचा श्‍वास व्हेंटिलेटरवर सुरू आहे. नागपूर विभागात एक जानेवारीपासून या आजाराच्या रुग्णसंख्येने शतक गाठले आहे. तरीही महापालिका सुस्त आहे.

नागपूरसह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांत ‘स्वाईन फ्लू’च्या संशयीत रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत. स्वाइनबाधित रुग्णांची संख्या वाढल्यावरही महापालिकेचा आरोग्य विभाग जनजागृतीपलीकडे काहीही करताना दिसत नाही. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदीनुसार आतापर्यंत १०४ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली असून, यातील आठ रुग्ण दगावले आहेत. मृत्यूवर काहीसे नियंत्रण आले असले तरी लागणग्रस्तांचा आकडा फुगत आहे. हवेत गारवा असल्यामुळे बाधितांसहित मृत्यूंची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे.

लसीकरणाला थांबा
स्वाइन फ्लूचा सर्वाधिक धोका मधुमेह, रक्तदाब, गर्भवती, हृदयरोग, मूत्रपिंड व फुप्फुसाचा विकार असणाऱ्यांना आहे. तो धोका टाळण्यासाठी राज्याच्या साथरोग विभागाच्या तांत्रिक समितीने अशा रुग्णांना स्वाइन फ्लू प्रतिबंधित लस देण्याची शिफारस केली होती. मात्र, राज्यातील सरकारी रुग्णालयांसह इतरही केंद्रांवर वैद्यकीय तपासणीला येणाऱ्या मातांना स्वाइन फ्लू (इन्फ्लुएन्झा- ए, एच एन) प्रतिबंधात्मक लस देण्यात येत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com