विद्यापीठाच्या १३० परीक्षा दोन टप्प्यांत - प्र-कुलगुरू डॉ. येवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभामुळे २४ मार्चला होणाऱ्या १३० परीक्षा ८ एप्रिलला घेण्याचे ठरले. या दिवशी सीबीएसईतर्फे आयआयटी व एनआयटीसह अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी ‘जेईई मेन’ आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. आता परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार असून, ९ ला परीक्षेचा पहिला टप्पा, तर १५ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात परीक्षा घेण्यात येईल.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना १ मार्चपासून सुरुवात झाली. यानुसार पदविका आणि प्रमाणपत्र परीक्षांचा समावेश पहिल्या टप्प्यात केला. चार टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेचा दुसरा टप्पा २४ मार्चपासून सुरू होणार होता. या टप्प्यात बी.ए., बी.कॉम, बीएससीच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरसह एम.ए., एम.कॉमसारख्या परीक्षांचा समावेश होता. मात्र, २४ मार्चला दीक्षान्त समारंभ झाल्याने १३० परीक्षांचे वेळापत्रक बदलले. या वेळापत्रकानुसार आठ एप्रिलला परीक्षा घेण्याचे ठरले. यावर शहरातील काही महाविद्यालयांनी ‘जेईई मेन’ची ऑफलाइन परीक्षा याच तारखेला असल्याची माहिती दिली. एकाचवेळी दोन परीक्षा घेता येणे शक्‍य नसल्याने विद्यापीठाने पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्याचे ठरविले. 
या परीक्षा नेमक्‍या कोणत्या तारखेला घ्यायच्या यावर बराच खल झाला. त्यातूनच मार्च महिन्यात संपलेल्या परीक्षांमधील एक पेपर ९ एप्रिलला होईल. 

याशिवाय जे विद्यार्थी पहिल्या, तिसऱ्या आणि बी.कॉम अंतिम वर्षातही आहेत. त्यांच्या परीक्षा रविवारी १५ एप्रिलला होईल. सोमवारी या परीक्षांच्या तारखांचे परिपत्रक संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. 

परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक वेळ जाऊ नये यासाठी लवकरात लवकर परीक्षा घेण्याचा मानस विद्यापीठाचा आहे. त्यातूनच या तारखांमध्ये परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही.
- डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू

टॅग्स